वसंतराव मुळीक बैठक
पुतळ्याचे निकृष्ट काम करणाऱ्यांना
अटक करा ः वसंतराव मुळीक
मराठा महासंघातर्फे बैठकीत मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः मालवणातील सिंधुदुर्गजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. या घटनेचा फक्त निषेध करून चालणार नाही तर संबंधितांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली. घटनेच्या पार्श्वभूमीवर महासंघातर्फे आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा भारतीय नौदलाच्या उच्च तंत्रज्ञानातून तसेच त्यांच्या देखरेखीतून निर्माण झाला होता. तो छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान खाली घालणारी आहे. ही घटना महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची अपमान करणारीही आहे. हे स्मारक करताना मजबुतीकरण व पुतळ्याचे सौंदर्य याकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणाचा कळस केला आहे.
हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतूविषयी आता शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, उदय देसाई, प्रकाश जाधव, शिवाजी मोरे, विजय पाटील, प्रतीक साळुंखे, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

