पॅचवर्क कामासाठी १४ निविदा-
रस्ते पॅचवर्क कामासाठी १४ निविदा
कोल्हापूर, ता. २७ ः शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. त्यासाठी चार विभागीय कार्यालयांतर्गत रस्ते पॅचवर्क कामासाठी १४ निविदा आल्या आहेत. त्यांच्यातून ठेकेदार निश्चित करून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. फक्त पावसाची उघडीप आवश्यक आहे.
रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी वॉरंटीत असलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना नोटीस काढल्या आहेत. १९ रस्ते खराब असल्याचे महापालिकेच्या पाहणीतून दिसून आले आहेत. अन्य रस्त्यांचीही पाहणी केली जात आहे. अशा स्थितीत वॉरंटीतील नसलेले पण दुरुस्ती आवश्यक असलेल्या अन्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी तातडीने दोन कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत ५० लाखांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. कमी कालावधीच्या निविदा प्रक्रियेसाठी १४ ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. गांधी मैदान कार्यालयासाठी चार, छत्रपती शिवाजी मार्केट कार्यालयासाठी तीन, राजारामपुरी कार्यालयासाठी चार, तर छत्रपती ताराराणी मार्केट कार्यालयासाठी ती निविदा आल्या आहेत. त्यांच्यातील कमी दर असलेल्या ठेकेदारांची निविदा निश्चित केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. एका कार्यालयांतर्गत दोन ठेकेदार नेमले जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

