

07469
कोल्हापूर : जय चंद्रप्रभा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन करताना माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम. शेजारी खासदार विशाल पाटील, अॅड. इस्माईल पटेल आदी.
जय चंद्रप्रभा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन
कोल्हापूर : जय चंद्रप्रभा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) येथे माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते झाले.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक, वैद्यकीय, रोटरी क्लब आदी क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. वसगडेसारख्या ग्रामीण भागात टेक्स्टाईल मॉल भागातील ग्राहकांना पुणे, मुंबई शहरातील खरेदीचे समाधान देईल, अशा सदिच्छा मान्यवरांनी दिल्या. ‘जय चंद्रप्रभा’चे भागीदार इब्राहिम जमादार, सौ. बेनझीर जमादार, डॉ. सुहास पाटील, अमोल पाटील (वसगडे), भरत माणगांवे (जयसिंगपूर), धनंजय कलघटगी (हातकणंगले), भरत बिरनाळे (अंकलखोप) यांनी मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोखर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अरुण लाड, माजी मंत्री जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकचे संचालक महिंद्र लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी खासदार प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, अशोकराव माने, सावकार मादनाईक, छायाताई खरमाटे, स्नेहलताई पाटील, मनुद्दीन बागवान, संदीप राजोबा, पैलवान चंद्रहार पाटील, पैलवान पृथ्वीराज पवार, रावसाहेब पाटील, राजीव पाटील, सतिश पाटील, पुष्पदंत दोंड्डनावर, प्रशांत पाटील-मजलेकर, रामचंद्र पवार, अमोल पाटील, सरपंच वृषाली काशीद, उपसरपंच अनिल पाटील, रोटरी गव्हर्नर ॲड. इस्माईल पटेल आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या. जमादार, पाटील, माणगांवे, कलघटगी, बिरनाळे कुटुंबीय उपस्थित होते. उद्घाटनानिमित्त पाच मजली मॉलची आकर्षक सजावट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.