

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत
योजनेत वीज देयक शून्य
सुमारे दोन हजारांवर कुटुंबांनी घेतला लाभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यातील १८८२ वीज ग्राहकांच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे, तर ४ हजार १० वीज ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. वापराएवढी वीजनिर्मिती होत असल्याने त्यांचे वीज देयक शून्यापर्यंत कमी झाले आहे. दरम्यान, या पर्यावरणपूरक योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ व जिल्हा अग्रणी बँकांचे गणेश गोडसे उपस्थित होते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत भाग घेणाऱ्या नागरिकांना प्रतिकिलोवॅट ३० हजार याप्रमाणे प्रथम दोन किलोवॅटसाठी ६० हजार आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी १८ हजार असे एकूण ७८ हजारांचे अनुदान केंद्र शासनामार्फत थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेकरिता बँकेमार्फत नागरिकांना कर्जही देण्यात येते, असे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.