मार्ग होणार का-

मार्ग होणार का-
Published on

07409
...
चप्पल लाईनचा रस्ता
गणेश विसर्जनापूर्वी होणार का?

विसर्जन मिरवणुकीतील मंडळांसाठी पर्यायी मार्ग

कोल्हापूर, ता. २७ ः छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी या दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी हा पर्यायी मार्ग आहे. तोपर्यंत तरी तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार की नाही, अशी धास्ती परिसरातील व्यावसायिकांना आहे.
‘चप्पल लाईन’ अशी ओळख असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी विविध प्रयोग केले. पर्यावरणपूरक साहित्य वापरून रस्ता करूनही तो टिकला नाही. त्यामुळे तो रस्ता काँक्रिटचा करण्याचे महापालिकेने ठरवले. त्यासाठी खोदाई करून काम सुरू केले. त्यातून ड्रेनेज लाईन, भुयारी वीजवाहिनीचे काम निघाले. परिणामी ते पूर्ण करत रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने बराच कालावधी लागला.
आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती. त्यावेळी रस्ता होण्यास विलंब होत असल्याने व्यावसायिक वैतागले आहेत, २० ऑगस्टपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर आहे त्या स्थितीत रस्ता सुरू करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला होता. त्यानंतर महापालिकेने लावलेल्या रेट्याने कामाला गती आली. आता एका भागाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या भागाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. आठवडाभरात ते काम होऊ शकते. त्यानंतर तो सुरू होण्यास किती कालावधी लागणार हे समजणार आहे. हा रस्ता गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांसाठी पर्यायी मार्ग आहे. तोपर्यंत हा रस्ता सुरू होणार का? याची चर्चा व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com