आजरा ः साडेपाच लाखांच्या दागिन्यांची लुट
साडेपाच लाखांच्या दागिन्यांवर
चोरट्यांनी मारला डल्ला
खासगी बसमधे लूट; मुंबई-आजरा प्रवासात प्रकार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २७ ः मुंबईहून खासगी ट्रॅव्हल्सने आजऱ्याकडे येताना देवर्डे (ता. आजरा) येथील शीतल दिलीप पाटील (वय ३५) यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. याची किंमत ५ लाख ३१ हजार २०० रुपये इतकी आहे. हा प्रकार मुंबई-आजरा प्रवासामध्ये सोमवारी (ता.२६) पहाटे घडला. यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पाटील यांनी आजरा पोलिसांत दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटील या मुंबई येथे रविवार (ता.२५) आजऱ्याकडे येण्यासाठी खासगी बसमध्ये चढल्या. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्यादरम्यान त्यांच्यासोबत असणाऱ्या पर्समधील साडे सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पाच हजार रुपये रोख असा ५ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला. सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलिस तपास करीत आहेत.
चौकट
यापूर्वीही घडले चोरीचे प्रकार
यापूर्वी खासगी बसेसमधून अनेकदा प्रवासी बॅगांसह इतर साहित्याच्या चोरीचे प्रकार घडले आहेत. किरकोळ प्रकार असल्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सोने व रोकड चोरीमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

