माजी पालकमंत्र्यांनी कोल्हापूर अविकसीत ठेवले ः धनंजय महाडिक

माजी पालकमंत्र्यांनी कोल्हापूर अविकसीत ठेवले ः धनंजय महाडिक
Published on

(फोटो - ७५४१)

माजी पालकमंत्र्यांनी कोल्हापूर अविकसित ठेवले
खासदार धनंजय महाडिक : ‘त्यांचे’ काम दाखवा; तीन लाखांचे बक्षीस देतो

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : जिल्ह्यात त्यांचे सहा आमदार, महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बँक सगळी सत्ता त्यांच्याच हातात आहे. तरीही कोल्हापूरचा विकास झाला नाही. शहरातील रस्ते, कचरा प्रश्न तसाच आहे. माजी पालकमंत्र्यांना कोल्हापूर अविकसित ठेवायचे आहे. त्यांनी केलेले काम दाखवा तीन लाखांचे बक्षीस देतो, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी आज केली. युवा शक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, ‘देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. आम्ही विमानतळ, रेल्वेस्थानक विस्तारीकरण, बास्केट ब्रिज या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करीत आहोत. लवकरच महापालिकेला १०० ई-बसेस मिळतील. नागपूर-रत्नागिरी, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यामुळे दळणवळण अधिक गतीने होणार आहे. मात्र, माजी पालकमंत्र्यांना आम्ही केलेली कामे दिसत नाहीत. थेट पाईपलाईन १४ वर्षे झाली तरी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. त्यांनी आय.टी.पार्क आणले नाही. टोलची पावती फाडून त्यातही ढपला पाडला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्या.’
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘मी राजकीय बोलणार नाही. कारण महापालिका आणि गोकुळमध्ये मी सत्तेत होतो. पण, केंद्र आणि राज्य सरकारने जनतेच्या हिताची अनेक कामे केली आहेत. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाचा विकास झाला नाही. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवविला. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला विजयी करा. गोकुळ अष्टमी हा कृष्णाचा सण आहे. कृष्ण नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले. हातामध्ये कोणतेही शस्र न घेता त्यांनी सत्याला विजय मिळवून दिला. म्हणून मला भगवान कृष्ण आवडतात.’

चौकट
‘पशुवैद्यकीय कॉलेज त्यांना देऊ नका’
खासदार महाडिक म्हणाले, ‘गोकुळ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्याला आमचा विरोध नाही. पण, ते चालवण्यासाठी त्यांच्या विद्यापीठाला देऊ नका.’

चौकट
मुश्रीफांचे भाकित खरे ठरले
कागल विधानसभा मतदारसंघातील दोन पथके युवा शक्तीची दहीहंडी फोडण्यासाठी आली होती. आपल्या भषणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचा उल्लेख केला आणि माझ्या मतदारसंघातील पथक जिंकेल असे, भाकित केले होते हे भाकित खरे ठरले. गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने तीन लाखांचे पारितोषिक जिंकले.

चौकट
‘ते’ भाकित करतात आणि दंगली होतात.
धनंजय महाडिक म्हणाले, ‘माजी पालकमंत्री हिंदुद्वेषी बनले आहेत. जिल्ह्यात दंगली होतील, असे भाकित त्यांनी केले की, दंगली होतात. त्यांना समाजात तेढ निर्माण करायची आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com