नरेंद्र पाटील प्रेस- अण्णासाहेब पाटील महामंडळ

नरेंद्र पाटील प्रेस- अण्णासाहेब पाटील महामंडळ

Published on

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळातर्फे उद्या मेळावा

कोल्हापूर, ता. २९ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शनिवारी (ता. ३१) जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता त्याचे उद्‍घाटन होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यावेळी प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘राज्यात एक लाखापेक्षा अधिक मराठा उद्योजकांची संख्या शासनाच्या योजनेतून पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित मराठा बांधवांपर्यंत महामंडळाची योजना पोहोचावी यासाठी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. येथे यशस्वी उद्योजकांचा, वित्तीय सहकार्य करणाऱ्या बॅंकांचाही सत्कार केला जाणार आहे. मराठा समाजातील बांधवांनी महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा उपयोग करून घ्यावा, यासाठी मेळाव्यातून अधिक माहिती दिली जाणार आहे. बॅंकांनी दिलेल्या कर्जावरील १२ टक्के व्याज हे महामंडळाकडून भरले जाते. आज अनेक तरुण यामुळे उद्योजक बनले आहेत.’

चौकट
‘त्या’ प्रकरणांचे थर्ड पार्टी ऑडिट सुरू
पत्रकारांच्या प्रश्‍नांवर अध्यक्ष पाटील यांनी काही बनावट कागदोपत्री कर्ज उचलण्याचेही प्रकार झाल्याची कबुली दिली. संबंधितांची चौकशीही झाली आहे. विशेष करून सहकारी बॅंकांमध्ये अध्यक्ष, संचालक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून कार्यकर्ता जपण्यासाठी अशी कर्जप्रकरणे करीत असल्याचे दिसले आहे. त्यामुळे दिलेल्या कर्जावर, लाभार्थ्यांचीही चौकशी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी ऑडिट’ सुरू केल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com