

लोगो ः बेचिराख
-
फोटो 08219
निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आर्किटेक्ट नियुक्त करा
हसन मुश्रीफ : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह निर्माण संवर्धन समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः हेरिटेज लूक कायम ठेवून शासन निधीतून नाट्यगृहाची पुनर्बांधणी चांगल्या प्रकारे करायची आहे. त्यासाठी आराखडा, अंदाजपत्रक, मंजुरी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करायची असल्यास महापालिकेने संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करून घ्यावे, अशी सूचना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तीन समित्या स्थापन होतील. आचारसंहितेपूर्वी आर्किटेक्ट नियुक्त करून निविदाप्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेने काम करावे. तसेच आजच पोलिसांत आगीची फिर्याद द्यावी, असे आदेश दिले.
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह निर्माण संवर्धन समिती स्थापन केली आहे. या समिती सदस्यांची आज शासकीय विश्रामगृहावर पहिलीच बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी, प्रशासक व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एकत्र बसून आजच फिर्याद दाखल करून घ्या. स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करा. सादरीकरण पाहून आर्किटेक्टची नियुक्ती करा. खासदार शाहू महाराजांनी नेमलेल्या तीन समितींसमोर केले जावे. त्यात कृती समितीतील सदस्यांची, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांची आणि नाट्यकर्मी अशा तीन समितीच्या सदस्य निवडीचे अधिकार खासदार शाहू महाराजांना असतील. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठीची निविदा प्रक्रिया राबवावी.’’ पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही, असे आर. के. पोवार यांनी सांगितले. ॲड. बाबा इंदुलकर यांनी आगीच्या घटनेचा शोध घेणे गरजेचे आहे. पोलिस तपासाशिवाय विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येणार आहेत असे स्पष्ट केले. तर आगीची फिर्याद दाखल करू नये म्हणून मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप दिलीप देसाई यांनी केला. गुन्हा दाखल करण्यावरून वातावरण तापले. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन लावून माहिती घेतली. महापालिकेकडून काही दाखल केले जाणार असेल तर ते करून घेऊ असे त्यांनी सांगितल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘दुसऱ्याच दिवशी पोलिसांत जळीताची फिर्याद दिली आहे. फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली आहे. पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे. आर्किटेक्ट नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यासाठी सहा निविदा आल्या आहेत. बुधवारी आराखड्याचे सादरीकरण करण्यास त्यांना बोलवले जाणार आहे. ’
डॉ. रमेश जाधव, व्ही. बी. पाटील, बाळ पाटणकर, आनंद काळे, विजय देवणे, आनंद माने, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, अनिल घाटगे, इंद्रजीत नागेशकर, उदय गायकवाड, अमरजा निंबाळकर, सतीशचंद्र कांबळे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जयकुमार शिंदे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
चौकट
समित्या करणार देखरेख
कृती समिती सदस्यांची, बांधकाम क्षेत्रातील तज्ञ्जांची आणि नाट्यकर्मी अशा तीन स्वतंत्र तांत्रिक समित्या पुनर्बांधणीवर देखरेख करतील. नाट्यगृहाची मूळ मालकी शासनाची आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घ्यावा. नाट्यगृहाची उभारणी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.