

08060
कोल्हापूर ः राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या महापालिकास्तर १४ वर्षांखालील विजयी सेंट झेविअर्स व छत्रपती शाहू विद्यालय संघासोबत उपस्थित मान्यवर.
......
08058
कोल्हापूर ः राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या महापालिकास्तर १९ वर्षांखालील विवेकानंद कॉलेज व डी. वाय. पाटील कॉलेजच्या संघासोबत उपस्थित मान्यवर.
.........
‘सेंट झेविअर्स’, ‘शाहू विद्यालय’,
‘विवेकानंद’, ‘डी. वाय.’ विजयी
महापालिकास्तर शासकीय बॅडमिंटन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः महापालिका व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय शासकीय बॅडमिंटन स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, छत्रपती शाहू विद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, डी .वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज या संघांनी विविध गटांत विजेतेपद पटकावले.
राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत शहरातील बहुतांशी शाळांनी सहभाग नोंदविला होता. १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये सेंट झेविअर्स हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलचा दोन विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करीत विजेतेपद मिळवले. विजयी संघात आयुष कदम, रणवीर पाटील, वेद मट्टीमनी, शार्विल मेंच, स्वरेन पाटील यांचा समावेश आहे. मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाने (सीबीएसई) होलीक्रॉस हायस्कूलचा दोन विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघात सुभेदार वनंतरम, इशिता पाटील, प्रिशा मेहता, रिद्धी ओसवाल, ऋषिता पाटील यांचा समावेश होता.
१७ वर्षांखालील मुलांमध्ये छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) संघाने सेंट झेविअर्स हायस्कूलचा दोन विरुद्ध एक गुणाने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. विजयी संघात वेदांत मोरे, वेदांत पाटील, आयुष पाटील, ज्योतिरादित्य घुटे-पाटील, सुजल आडवकर यांचा समावेश होता. मुलींमध्ये शांतिनिकेतन स्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघात गार्गी आंबेकर, दिशा जोग, श्रेया कात्रुट, रितिका भोसले, अस्मी उरणकर यांचा समावेश होता.
१९ वर्षांखालील गटात मुलांमध्ये विवेकानंद कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालय ज्युनिअर कॉलेजचा दोन विरुद्ध शून्य गुणाने पराभव केला. विजयी संघात अभिनव हरणे, करण मोकारिया, शिवेंद्र चव्हाण, समीप भातेजा, स्वर्ण भोळा यांचा समावेश होता. मुलींमध्ये अंतिम फेरीत डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजने विवेकानंद कॉलेजचा दोन विरुद्ध शून्य गुणाने पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघात आदिती नरके, भार्गवी तोडकर, मुग्धा पाटील, राधिका काणे, हादी कापडी यांचा समावेश होता.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.