मालवण शिवराय पुतळा दुर्घटना ः डॉ. चेतन पाटील ताब्यात

मालवण शिवराय पुतळा दुर्घटना ः डॉ. चेतन पाटील ताब्यात
Published on

फोटो ः KOP24N08211
००००००००००
पुतळा कोसळल्याप्रकरणी
डॉ. चेतन पाटीलला अटक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला रचना सल्लागार डॉ. चेतन एस. पाटील (रा. शिवाजी पेठ) याला आज मालवण पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांकडून ताब्यात घेत अटक केली. त्याआधी त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्याला उद्या (ता. ३१) दुपारी सिंधुदुर्गातील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
डॉ. पाटील आज पहाटे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये स्वतःहून हजर झाला. त्यानंतर पथकाने त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे सोपविला. गेल्या चार दिवसांपासून त्याचे शिवाजी पेठेतील वेताळ तालीम परिसरातील घर, करवीर तालुक्यातील त्याचे फार्म हाऊस, गगनबावड्यातील मित्रांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्याद दिली होती. त्यानुसार तेथील पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे (ठाणे) व सल्लागार डॉ. पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक, आदी गुन्हे दाखल केले आहेत. सिंधुदुर्ग पोलिस त्याचा कोल्हापुरात शोध घेत होते. पुतळा उभारण्याचे काम जयदीप आपटे याच्या कंपनीने केले, तर डॉ. पाटील सल्लागार आहेत. पुतळा कोसळल्यानंतर गुन्हा दाखल होताच दोघेही पसार होते. डॉ. पाटील याचा मोबाईल बंद होता.
डॉ. पाटील यांची आई रुग्णालयात दाखल आहे. तो तेथे येण्याची शक्यता होती. दरम्यान, तो चिक्कोडीवरून बेळगावडे जाताना त्याने मित्राला संपर्क केला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्‍या मित्राकडून पुन्हा त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मित्राकडून पोलिस कारवाईबाबतची माहिती मिळल्यानंतर त्याच्याकडे हजर राहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अखेर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तो हजर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com