पुणे बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन

पुणे बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन
Published on

08129
कोथरूड : बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, पुणे युनिटच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी अधिकारी.

बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स
असोशिएशन सभेत आव्हानांवर चर्चा
पुणे ता. ३० : बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, पुणे युनिटची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोथरूडच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झाली. बँकिंग क्षेत्रासमोरील तसेच कामगार चळवळी समोरील नवीन आव्हाने, कामगार चळवळीचा इतिहास आणि महत्त्व, नवीन अधिकारी भरती, खासगीकरणाला विरोध, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातील अडथळे, आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सभेला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेश्वर, श्वेतांग त्रिवेदी, राष्ट्रीय महासचिव नीलेश पवार, पुणे विभागाचे अध्यक्ष अमोल सांगळे, पुणे विभागाचे महासचिव प्रमोद शिंदे, तसेच बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक लग्नजित दास, क्षेत्रीय महाप्रबंधक संजय कदम, राजीव कुमार, नरेंद्र देवरे, सौ. जयश्री देशमुख आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सभेला एक हजार सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com