उद्योग-व्यवसायाच्या विकासात जिज्ञासा महत्त्वाची

उद्योग-व्यवसायाच्या विकासात जिज्ञासा महत्त्वाची
Published on

उद्योग-व्यवसायाच्या विकासात
जिज्ञासा महत्त्वाची : डॉ. पाटील

शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ३० ः उद्योग-व्यवसाय निर्मिती आणि विकासामध्ये जिज्ञासा महत्त्वाची भूमिका बजावते. जिज्ञासेतूनच नवनिर्मितीच्या शक्यता पुढे येतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी आज सांगली येथे केले.
विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि यलो सिटी आंत्रप्रिन्युअरशिप फोरम सांगलीतर्फे आयोजित ‘उद्योजकता विकास आणि युवक’ या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. दीपस्तंभ सांस्कृतिक भवनातील या कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन प्रमुख उपस्थित होते.
डॉ. सुहास खामले यांनी ‘युवा उद्योजकता विकास आणि पालकत्व’ या विषयावर, ॲड. पिराजी मिठारे यांनी ‘बँकिंग संबंध व कागदपत्रे आणि युवा उद्योजक’ या विषयावर, तर अविनाश भाले यांनी ‘उद्योजकता विकासातील परस्पर संबंध’ या अनुषंगाने मार्गदर्शन केले. डॉ. जगन कराडे, कुंदन शिनगारे उपस्थित होते. समारोपप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com