आरोग्य लेख

आरोग्य लेख
Published on

हेल्थ पुरवणी

बहुविध उपचार
पद्धतींचा दिलासा

आजारी व्यक्ती, सुश्रुषा करणारे नातेवाईक विविध सल्ल्यांनी उपचारापूर्वीच हतबल होतात. त्यानंतर उपचारासाठी पैसे उसने घेणे, विम्याचे पैसे, विमा नसेल तर योजनांचा लाभ घेणे यात दोन महिने ते वर्षभर घरदार घायाळ होऊ जाते. असा प्रसंग प्रत्येक घरात कधी ना कधी येतो. अशी अवस्था टाळण्यासाठी तंदुरुस्त मन, धडधाकट आरोग्य कमवण्यासाठी पाच-सहा थेरपींचे उपचार व ‘आहार हेच औषध’ सांगणाऱ्या पूरक वैद्यकीय मार्गदर्शन उपचारांच्या सेवा कोल्हापुरात वाढत आहेत.
- शिवाजी यादव
-----------------------------

कोल्हापुरात गंभीर आजारांवर उपचार सुविधा आहेत. तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तसेच अगदी घरगुती स्वरूपाच्या दहा-बारा बेडच्या रुग्णालयापासून ते शंभर दोनशे बेडच्या मल्टीस्पेशॅलिटी वैद्यकीय उपचार सेवांच्या उपलब्धतेमुळे कोल्हापूरची ओळख मेडिकल हब अशी होत आहे. या साऱ्यात बहुतांशी रुग्णालयांची सेवा ॲलोपॅथिक उपचार देणाऱ्या आहेत. या सेवेत नियमित आजारावरील उपचार सेवा किफायतशीर पैशात मिळते. मात्र गंभीर आजार शस्त्रक्रिया गरजेनुसार दीर्घकाळ उपचारासाठी कमीत कमी दहा हजारांपासूनच पाच लाखांपर्यंतचा उपचार खर्च आहे. ज्यांना खर्च शक्य आहे ते उपचार घेतात ज्यांना खर्च शक्य नाही अशा व्यक्ती लक्षणे अंगावर काढत राहतात तर काहीजण उसने पैसे घेऊन कर्ज काढून उपचार करून घेतात.
वास्तविक रुग्णालयात जावेच लागू नये अशी जीवनशैली आचरणाचा पर्याय अनेकजण शोधतात. प्राथमिक अवस्थेतच एखादा आजार औषधावर कमी करणाऱ्या थेरपी व उपचारपूरक वैद्यकीय सेवा येथे आहेत. वैद्यकीय मार्गदर्शन, गरजेनुसार उपचार देणारे आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथिक, ॲक्युप्रेशर थेरपी, निसर्गोपचार, युनानी या शाखांच्या उपचार शाखा आहेत.
याशिवाय समुपदेशन सेवा, मानसोपचार सेवा, फिजोओ थेरपी, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शन व उपचार सेवेत सहभाग आहे. यात क्लिनिकल तसेच मोठ्या रुग्णालयातील उपचार सेवेत जोड स्वरूपात सेवा मिळतात. या सेवा कधी कशा घ्याव्यात याबाबतची जागृती होत आहे. तसा अशा उपचार केंद्रांचा प्रतिसादही वाढतो.

चौकट
‘टेली मानस’ वरदान
मुलगा शाळेत जातो; पण अभ्यासात प्रगतीच दिसत नाही सतत खिन्न अवस्थेत असतो. अशा मुलांचा बुद्ध्यांक तपासणे, गरजेनुसार समुपदेशन करणे अशी बालमानसशास्त्रावर आधारितही सेवा आहे. एखाद्या व्यक्तीला ठरावीक गोष्टींची भीती वाटते, सतत संशय येतो, निराशा, चिडचिड होते, अतिप्रमाणात राग येतो आदी लक्षणांच्या मानसिक रुग्णांना त्यांना प्राथमिक लक्षणापासून ते गंभीर मानसिक आजारावरील उपचार सेवेही समुपदेशन देणारी सेवा आहे. यात शासनाही ‘टेली मानस’ अशी सेवा टोल फ्री क्रमांकावर सुरू आहे. २४ तास सेवा सुरू असते. मानसिक रुग्णांना फोनवर मार्गदर्शन केले जाते. शासनाची आरोग्य विभागाची मोफत मिळणारी सेवा वरदान ठरली आहे.

08248
आयुर्वेदिक सेवा
आयुर्वेदिक रुग्णालय, क्लिनिक ३७०, याशिवाय बीएएमएस, एमडी (आयुर्वेद ) असे शिक्षण झालेल्या तज्ज्ञ वैद्यकांची सेवा मिळते. सिद्धगिरी मठ, विश्व पंढरीपासून ते आयुर्वेदीक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयापर्यंतच्या उपचार सेवा आहेत. आयुर्वेद पंचकर्म सेंटर आहे. आयुर्वेदात शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता करणारी पोटात जाणाऱ्या औषधापासून ते बाह्यअंगाला तेल, मसाजपर्यंतचे उपचार आहेत. रुग्णांची लक्षणे, तीव्रता पाहून असे उपचार दिले जातात. अगदी शंभर रुपयांपासून ते पन्नास हजारांपर्यंतची उपचार सुविधा आहे. थोड्याफार फरकाने क्लिनिक सेवा आयुर्वेदिक उपचार मिळत आहेत.

08249
होमिओपॅथीकडे वाढता कल
होमिअपॅथिक क्लिनिक १५० डॉक्टर्स आहेत. तीन होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयांची चार रुग्णालये आहेत. येथे बीएचएमएस किंवा एमडी होमिओपॅथीकचे उपचार मिळतात. गोळ्या, पातळ औषधे तर काही पावडर अशा स्वरूपात औषधे मिळतात. कमी पथ्ये आणि रुग्णांचा पूर्व आरोग्य इतिहास जाणून घेऊन लक्षणानुसार उपचार दिले जातात. अगदी दोन-पाचशे रुपयांत औषधे मिळतात. आजाराची लक्षणे प्राथमिक असताना या थेरपीचा वापर केल्याने भविष्यातील आजारांचा गंभीर धोका टळण्यास मदत होते. त्यामुळे होमिओपॅथीचे उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

08250
निसर्गोपचार केंद्र
काही आयुर्वेद डॉक्टरांनी विविध वैद्यकीय ग्रंथातील निसर्ग उपचारांचा आधार घेत उपचार सेवा दिली आहे. यात नियमित आजार किंवा गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी नैसर्गिक आहार पोट साफ ठेवतो. इथे आरोग्याच्या तक्रारी कमी होताता. नियमित आजार किंवा जटील आजाराची लक्षणे दिसताच घरात वापरल्या जणाऱ्या खाद्यातील हिरव्या पालेभाज्या, फळे, लसूण, कांदा, कडीपत्ता, मसाले, तुळशीची पाने यापासून ते दंतमंजनासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून अनेक आजार प्राथमिक अवस्थेत असताना ते कमी होण्यास मदत होते. खबरदारी म्हणून निसर्ग उपचारांचा आधार घेतला जातो.

08251
योग वर्ग
अनेक गंभीर व्याधींपासून दूर राहण्यासाठी योग कसा करावा, कोणत्या वयात, शाारीरिक, मानसिक अवस्थेत कोणत्या योगाचा उपयोग होतो. याचे योग्य मार्गदर्शन करणाऱ्या योग गुरूंचे वर्गही येथे आहेत.

08252
फिजिओथेरपी
रस्त्यांची दुरवस्था असो किंवा अपघात यातून निर्माण होणारे मणका, मेंदू व हाडांच्या आजारातील त्रास कमी करण्यासाठी काही व्यायाम आहेत. त्याबाबचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक फिजीओथेरपीद्वारे केले जातात. यात पारंपरिक व आधुनिक उपचार दिले जातात. प्रत्येक रुग्णाने असा व्यायाम किती करावा, त्याच्या आरोग्यावरील सकारात्मक बदलासाठी पारंपरिक व अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या आधारे उपचार केले जातात.

08253
आहारतज्ज्ञ
पोषणमूल्ये कशी कोणाच्या आरोग्याला कितपत महत्त्वाची आहेत. एखाद्या पेशीची अतिरिक्त वाढ कमी करणे किंवा कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पोषणमूल्ये असलेले खाद्य घटक किंवा पदार्थ खावेत, कोणते पदार्थ टाळावेत वा खाल्ले तरी किती प्रमाणात खावेत, शरीराच्या गरजा याबाबत मार्गदर्शन मिळते.

08255
ॲलोपथीचा आधार
गंभीर आजार म्हटले की, रुग्णालय, डॉक्टर, चाचण्या, शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत खाटावर पडून राहणे, तीव्र वेदना अशा ॲलोपॅथीच्या उपचाराची भीती अनेकांना असते. या भीतीपोटी अनेकजन घाबरून उपचाराला जात नाहीत. एखाद्या आजाराची प्राथमिक लक्षणे वेळीच उपचार न घेतल्याने गंभीर बनतात. अशा रुग्णांसाठी काही ॲलोपॅथी रुग्णालयांनीही अन्य पॅथीचे उपचार देणारे डॉक्टर्स, योगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आयुर्वेदीक डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट यांच्या सेवा देण्यास सुरवात केल्याने येथील उपचारसेवेला बहुविविधता आली आहे. परिणामी रुग्णांचा त्रास कमी होण्यास व मानसिक दिलासा मिळण्यास मदत होत आहे. तसे उपचार सेवेतील यशही ठळक होत आहे, हेही रुग्णांसाठी वरदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com