

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
...........
08196
बाबूराव पाटील
निवासी फुटबॉल केंद्र व्हायलाच हवे
फुटबॉल आमचा श्वास आहे. पेठापेठांमधील अगदी सात-आठ वर्षांच्या मुलाला ग म भ न येत नसेल. मात्र, फुटबॉलमधील तालीम मंडळांच्या खेळाडूंची नावे माहीत असतात. इतका फुटबॉल कोल्हापूरकरांच्या घराघरांत पोहोचला आहे. गेली अनेक वर्षे मी एका तालीम संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. मात्र, या खेळाडूंना सुसज्ज सुविधा देऊ शकत नाही, ही खरी शोकांतिका आहे. मात्र, नवोदितांना शास्त्रोक्त पद्धतीचे फुटबॉल प्रशिक्षण केवळ क्रीडा प्रबोधिनीसारख्या प्रशिक्षण केंद्रातूनच मिळू शकते. असे केंद्र कोल्हापुरात पूर्वी होते. ते पुन्हा सुरू झाले तर कोल्हापूरचे फुटबॉलपटू निश्चितच देशातील अनेक नामांकित संघांकडून खेळू शकतील. येथील स्थानिक खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे. त्याच्या जोडीला क्रीडा प्रबोधिनीच्या केंद्रातून दर्जेदार प्रशिक्षण मिळाले तर अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू मिळतील. हे केंद्र केवळ कोल्हापूरपुरते मर्यादित राहणार नाही. यातून कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा येथील खेळाडूंनाही येथे प्रवेश मिळेल. एकूणच राज्याला चांगले खेळाडू मिळतील. याचा विचार राज्यकर्त्यांनी जरूर करावा आणि हे केंद्र कोल्हापुरात त्वरित सुरू करावे.
- बाबूराव पाटील, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक
..............
08195
आर्या मोरे
सर्वच खेळांसाठी प्रशिक्षण केंद्राची गरज
कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळला जातो. या खेळाच्या विकासासाठी आज ग्रासरूट प्रशिक्षणाची गरज आहे. लहान वयातच तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले तर ती मुले-मुली निश्चितच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतात. कोल्हापूर सर्वच बाबतीच अग्रेसर आहे. नेमबाजी असो, जलतरण असो, रग्बी, कुस्ती, खो-खो, कबड्डी, ज्यूदो, कराटे, क्रिकेट अशा सर्वच खेळांत येथील मुले, मुली नावलौकिक वाढविणारा खेळ राज्य, राष्ट्रीय पातळीवर करतात. मात्र, राष्ट्रीय संघात वर्णी लागताना त्यांचा कस लागतो. काही गुणांमध्ये निवड हुकते. त्यामुळे राज्य शासनाने आता विचार करून कोल्हापूरला फुटबॉलसह सर्वच खेळांचे प्रशिक्षण केंद्र द्यावे. मुलांसोबत मुलींच्या प्रशिक्षणाची सोय या केंद्रात व्हावी. जेणेकरून कोल्हापुरातील मुलींनाही या केंद्रात संधी मिळेल. आज मुलांसोबत मुलींनाही व्यावसायिक फुटबॉल संघाची दारे खुली झाली आहेत.
- आर्या मोरे, राष्ट्रीय महिला फुटबॉलपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.