डॉ. श्रीनिवास पाटील यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’

डॉ. श्रीनिवास पाटील यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’
Published on

फोटो 08172

डॉ. श्रीनिवास पाटील यांना
‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’

खासदार शाहू महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सन्मान

कोल्हापूर, ता. ३० : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला. रविवारी (ता. १) विद्यापीठाच्या १९ व्या स्थापना दिनी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली.
या कार्यक्रमाला डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माजी मंत्री, आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची उपस्थित राहणार आहे.
विद्यापीठाच्या आवारात विविध कार्यक्रम होऊन साडेदहा वाजता हॉटेल सयाजीच्या व्‍हिक्टोरिया सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी जीवन गौरव पुरस्कारासह, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी, असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.

चौकट
विविध क्षेत्रांत योगदान
डॉ. श्रीनिवास पाटील हे माजी सनदी अधिकारी आहेत. एम. ए. एल.एलबी.पर्यंत शिक्षण झालेल्या डॉ. पाटील यांनी राज्य व केंन्द्रीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर राजकारणाच्या माध्यमातून जनसेवेला वाहून घेतले. डॉ. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार झाले आहेत. २०१३ ते २०१८ दरम्यान सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. पाटील यांची विद्यापीठातर्फे यावर्षीच्या डॉ. डी वाय पाटील जीवन गौरव पुरस्कारांसाठी निवड केल्याची माहिती डॉ. मुदगल व डॉ. भोसले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com