त्वचा विकार सौंदर्यशास्त्र

त्वचा विकार सौंदर्यशास्त्र
Published on

08257

शास्त्रोक्त उपचारच
सौंदर्य फुलवतील

व्यक्तिगत सौंदर्याविषयी बहुतेकजण जागरूक असतात. यातही केस व त्वचा अधिक तेजल दिसावी यासाठी आपापल्या पातळीवर दक्ष असतात. काही वेळा केसगळती किंवा त्वचाविकार, डाग पडू लागल्यास अनेकजन उपाय, उपचार सुरू करतात. अपुऱ्या माहितीवर स्वतःच औषधे घेणे किंवा केस, त्वचेवर सरसकट औषधे लावणे, घरगुती उपाय करणे किंवा कारागिराकडून केस, त्वचेचे उपचार घेणे यातून काहीच्या केस किंवा त्वचेवर गंभीर परिणाम होतात. जो विकार बरा होणारा असतो तोही बरा होणे मुश्कील होते. असे धोके टाळण्यासाठी अधिकृत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या अनुभव, कौशल्यसिध्द तज्ज्ञांकडून उपचार घेणे उजळ व्यक्तिमत्त्वासाठीच नव्हे तर आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
- डॉ. माधवी लोकरे, त्वचा व सौंदर्यविकारतज्ज्ञ
......................

एखाद्याचा विवाह ठरला की, व्यक्तिमत्त्व उजळ करण्यासाठी दोन ते चार महिने अगोदरपासून सौंदर्याविषयक उपचार घेणे सुरू होते. यात त्या व्यक्तींची जशी त्वचा आहे त्याच त्वचेचे सौंदर्य वाढवणे. विवाहादिवशी ते छान दिसतील, त्वचा कशी छान करता येईल यासाठी वैद्यकीय उपचार आहेत. त्यात काही औषधे वापरली जातात. काही उपचार मशिनच्या सहाय्याने होतात. हे काम त्वचा, सौंदर्य विकार तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांकडून केले जाते. त्वचा खराब होऊच नये तसेच मेकअपम न करताही आहे तिच त्वचा लेझरनी खूप चांगले काम केले जाते. त्यात पिको लेझर आले आहे. रिफाईन काम करणारी अन्य मशिन आहेत त्याची उपयुक्तता जास्त आहे.

त्वचेवर सरसकट उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यात कुठेतरी त्वचा, केशविषयक कोर्स केलेल्या जेमतेम अनुभवाच्या व्यक्तीकडून दिलेला सल्ला किंवा केलेले उपचार, घरगुती उपचार किंवा समाज माध्यमातील टिप्स वाचून केलेले काही थोडंफार उपयोगी पडेल, पण ते बहुतांशीजणांना उपयोगी पडतील असे नाही. याउलट सरसकट किंवा वैद्यकीय उपचाराचे शिक्षण व अनुभव नसलेल्या व्यक्तीकडून घेतलेल्या उपचारातून अनेकांना बाधा झालेली दिसते.
याउलट जी व्यक्ती एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले व त्वचाविकाराचा वैद्यकीय अभ्यासक्रम केला आहे. प्रॅक्टीसचा अनुभव आहे. अशा डॉक्टरांकडून त्वचेवर करून घेतलेले उपचार यात नक्कीच फरक असतो. रुग्णांनी त्वचा विकारावरील उपचारासाठी तज्ज्ञांची निवड करताना ते खरेच तज्ञ आहेत का याची माहिती घेऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णाच्या प्रकृती, त्वचा, केसांचा पोत त्यानुसार औषधे व उपचाराची दिशा शास्त्रोक्त पध्दतीने ठरवतात. त्यानंतर उपचार करतात.
केस गळतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळा आजारामुळे, रक्तांतील विशिष्‍ट घटकाच्या कमतरतेमुळे किंवा दूषित घटकामुळे अशा विविध कारणांतून केस गळती होती अशी केस गळती होण्यासाठीची कारणे शोधणे, केसांचा व त्या रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास करणे, त्यावर आधारे केसावर उपचार करणे अपेक्षित आहे. असा उपचार अधिक शाश्वत व सुरक्षित असतात. मात्र काही वेळा कमी पैशात व सरसकटपणे केसावर केलेल्या उपचारातून अचूक निदान केले जाते किंवा होतेच असे नाही. अचूक निदानाअभावी केलेल्या केसावरील उपचारातून काहीना गुण आला पण काहींचे केस ठरावीक उपचार व कालावधीनंतर गेले. ते केस परत येत नाहीत. तेव्हा केस प्रत्यारोपणाचा वापर करावा लागतो. असाही सरसकट उपचारात धोका विचारात घेणे आवश्यक आहे.
कोडाच्या आजारावर प्रभावी औषधे व उपचार आले आहेत. यात विटीलोगो सर्जरी आहे. नव्याने स्किन ग्राफींग होते. आपल्याच शरीरातील रंगपेशी बाजूला काढल्या जातात. कोडाचा डागात रंगपेशींचे सोल्यूशन तयार करून ते कोडाचे डाग असलेल्या रोपण केले जाते. त्यानंतर हळूहळू कोड झालेली त्वचा नियमित त्वचेसारखी दिसू लागते. मात्र असे उपचार वैद्यकीय तज्ज्ञांकडून समजून घेऊन करणे हिताचे ठरते.
चायीच्या आजारात अनेकजन घरगुती उपाय म्हणून बिबा उगळू लावतात. बिब्याच्या रसाची तीव्रता एखाद्याच्या त्वचेला सोसत नाही. तेव्हा त्याची जखम होते. जखम वरच्यावर असेल तर उपचाराने बरी होईल. मात्र जखम खोलवर गेल्यास तिथे केस येणे मुश्कील होते. त्वचाही खराब होऊ शकते. त्यावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात.

चौकट
एआयचा वापर मर्यादित
सौंदर्य उपचारासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) वापर येणाऱ्या काळात होऊ शकणार आहे. यात त्वचेचा पोत विचारात घेऊन त्यावर उपचारासाठी तसा प्रोग्रॅम तयार केला जातो. त्या आधारे त्वचेवर उपचार होऊ शकतील. मात्र त्वचेवर उपचार करण्यापूर्वी त्वचेचे वाचन करावे लागते. त्यासाठी ‘एआय’चा वापर होऊ शकतो. मात्र प्रत्येक रुग्णांच्या त्वचेचा पोत व तिचा स्वभाव वेगवेगळा आहे. तेव्हा त्वचा व्यक्तिगतस्तरावर बघून घेणे, लक्षणे व व्यक्तीचा उपचाराचा प्रतिसाद समजून घेऊन त्वचेवर उपचार करावे लागतात. त्यासाठी मानवी बुध्दीमत्ता, अनुभव, कौशल्य याचा संगम साधून केलेले उपचार अधिक शाश्वत प्रभावी ठरण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे एआयच्या ठरावीक प्रोग्रॅमव्दारे ठरावीक त्वचांवर एयआयव्दारे उपचार जरूर सुलभ होतील. मात्र तोच प्रोग्रॅम सरसकट सर्वच त्वचेवरील उपचारासाठी प्रभावी ठरेल का हे भविष्यात अधिक सुस्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com