पोलिसवृत्त

पोलिसवृत्त
Published on

बॅंकेने सील केलेल्या
मिळकतीत प्रवेश;
दांपत्यावर गुन्हा

कोल्हापूर ः थकीत कर्जामुळे बॅंकेने ताब्यात घेऊन सील केलेल्या मिळकतीत प्रवेश केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल झाला. मधुकर कुंभार व लता कुंभार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राजारामपुरी ११ वी गल्ली येथील मिळकतीला बॅंकेने लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सस्मित सुरेश कुबेर (वय ३९) यानी बॅंकेच्या वतीने फिर्याद दिली.
..............
बांधकामाच्या ठिकाणी
मजुरांमध्ये हाणामारी

कोल्हापूर, ता. ३० ः संभाजीनगर बसस्थानकासमोर सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या बांधकामावर मजुरांच्या दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भर रस्त्यावर सुरू असलेल्या हाणामारीची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस त्याठिकाणी गेले; पण संबंधितांनी हे भांडण आपसात मिटवून घेऊ, असे पोलिसांना सांगितले; मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी, हाणामारी व गोंधळ केल्याप्रकरणी पोलिसांनीच याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिस अंमलदार मोहन लगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॅब्रिकेशन कामगार सौरभ अनिल भोपळे (वय २७), रितेश सदाशिव सूर्यवंशी (३०), दीपक सदाशिव सूर्यवंशी (३४, तिघे रा. रविवार पेठ), अजय दीपक पोवार (२९), गौतम दीपक पोवार (२१, दोघे रा. महाराणा प्रताप चौक), दिलावर राजू नदाफ (२२, रा. पाचगाव), सुतारकाम मजूर आशाराम चौधरी (वय २७) व पूनमचंद चौधरी (२६, दोघे रा. राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
.....................
तरुणीची छेड
काढल्याप्रकरणी
एकास अटक
कोल्हापूर ः राजारामपुरी येथे नोकरीवर येणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी प्रमोद हरिदास महाडिक (वय ३०, रा. चिंचवाड, करवीर) याला अटक केली. २० दिवसांपूर्वी पीडित तरुणीचा पाठलाग करत आलेल्या संशयित महाडिकने अडविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मागील दोन दिवसांपासूनही तो दुचाकीवरून या मुलीचा पाठलाग करीत होता. यामुळे तिने थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी संशयिताला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com