

08238
कोल्हापूर : कामगार कल्याण मंडळातर्फे घेतलेल्या चर्चासत्रात बोलताना कामगार आयुक्त रवीराज इळवे. यावेळी संजय शेटे, हरिश्चंद्र धोत्रे, महेंद्र तायडे, मनोज पाटील आदी उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांचीही नोंद करा
आयुक्त रवीराज इळवे : कामगार कल्याण मंडळातर्फे चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सुरक्षित व संघटित कामगार घेत आहे. यासोबतच विविध खासगी आस्थापना, दुकाने, कंत्राटी कामगारांचीही नोंद मंडळाकडे करून त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक संस्था, आस्थापना व संघटना प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन कामगार आयुक्त रवीराज इळवे यांनी केले.
कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांना मिळणारे लाभ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. शेटे म्हणाले, ‘‘मंडळाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित असलेल्या कामगारांना त्यांच्या पाल्यासह लाभाच्या प्रवाहात आणण्याकरिता चेंबर्स ऑफ कॉमर्स सर्वतोपरी सहकार्य करेल.’’
‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे म्हणाले, ‘‘कामगारांच्या सर्वांगीण विकासात उद्योजकही सहभागी होतील. त्याचाच भाग म्हणून उद्योजकांनी आपल्या कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी कामगार कल्याण मंडळाकडे करावी, याकरिता ‘मॅक’तर्फे आवश्यक सहकार्य केले जाईल.’’
कामगार उपाआयुक्त महेन्द्र तायडे यांनी पीपीटीद्वारे उपस्थितांना कामगार कायद्यांची माहिती दिली. पुणे विभागाचे सहायक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, समाधान भोसले, संभाजी पवार, कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम, सचिन आवळेकर, सचिन खराडे, संघसेन जगतकर, सहायक केंद्रसंचालक चंद्रकांत घारगे, दीपक गावराखे यांनी संयोजन केले.
यावेळी शंकर पाटील, डॉ. अमोल कोडोलीकर, मदन पाटील, सत्यजित खाडे, उज्वल नागेशकर, अशोक तेहलाणी, दिलीप कुकरेजा, केरबा पाटील, राकेश राठोड, अनिल नागराळे प्रमुख उपस्थित होते.
------------
चौकट
पाच कंपन्यांना प्रतीकात्मक धनादेश
गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक लाभार्थी असलेल्या पाच कंपन्यांना लाभाच्या रकमेचे प्रतीकात्मक धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. यात इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक शशिकांत माने यांनी ७२ लाख ९० हजारांचा धनादेश स्वीकारला. आजरा साखर कारखाना सहा लाख ७२ हजार, जवाहर साखर कारखाना हुपरी यांनी ६ लाख १४ हजार, सदाशिवराव मंडलिक कारखाना ६ लाख ६ हजार ५००, तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूरतर्फे दीपक घारगे यांनी ५ लाख ९४ हजार ५०० रकमेचा धनादेश स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.