सतेज पाटी- मालवण

सतेज पाटी- मालवण
Published on

छत्रपती शिवरायांच्या अवमानाचे
प्रायश्चित सत्ताधाऱ्यांना भोगावे लागेल

सतेज पाटील, माध्यमांशी साधला संवाद

कोल्हापूर, ता. ३० : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे, हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा असून, त्यांची अकार्यक्षमता यातून सिद्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अवमानाचे प्रायश्चित सत्ताधाऱ्यांना भोगावे लागेल, असे मत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आपटेंना नौदलापर्यंत कुणी पोहचवले, त्यांची शिफारस कोणी केली, याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत असताना आम्ही गप्प बसावे, असे सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तुम्ही चूक केली आहे. राजकारण आम्ही केले असे वाटते; मग उद्‌घाटन राजकीय का केले ? मुख्यमंत्र्यांनी केवळ माफी मागून काय होणार नाही. जगभर नौदलाची, देशाची जी प्रतिमा झाली ती तुमच्या माफी मागण्याने परत येऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com