

नागोरीने ग्रेटर नोएडातून
आणले ‘एमडी’ ड्रग्ज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या समीर उर्फ पाबलो गुलाब शेख (वय ३१, रा. बारामती) याला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. त्याने हे ड्रग्ज शस्रतस्कर मनीष नागोरीकडून घेतल्याचे समोर आल्याने त्यालाही अटक केली होती. पोलिस चौकशीत नागोरीने ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने पोलिस सखोल तपास करीत आहेत.
मनीष नागोरी याच्यावर शस्त्र विक्री, अमली पदार्थ विक्री, कारागृहात मोबाईल, गांजा पुरविल्याचे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरात झालेल्या कारवाईत ३६ हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. नागोरीने नोएडामधून ३० ग्रॅम ड्रग्ज आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापैकी १२ ग्रॅम जप्त केले असल्याने उर्वरित ड्रग्ज कोणाला विकले याची माहिती पोलिस घेत आहेत.
तस्करीचे मोठे रॅकेट
एमडी ड्रग्जचा वापर पुणे, मुंबईतील अनेक रेव्ह पार्ट्यांमध्ये झाल्याचे यावेळी अनेकदा समोर आले आहे. नागोरीचे हे रॅकेट राज्यभर असण्याची शक्यता आहे. तसेच हे ड्रग्ज त्याला पुरविणारा पुरवठादार, विक्रीचे जाळे चालविणारे पंटर या सर्वांच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. नागोरीच्या चौकशीत आणखीन धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.