वंदे भारत आज प्रारंभ

वंदे भारत आज प्रारंभ
Published on

कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’चा आज प्रारंभ
कोल्हापूर , ता. १५ : दीर्घकाळच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर ते पुणे मार्गावर सुरू होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्‍प्रेसच्‍या सेवेस उद्या सोमवारी (ता. १६) प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सेवेव्दारे वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवितील. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमण्णा यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता कोल्हापूरच्या शाहू महाराज टर्मिनसवरून वंदे भारतचा प्रवास सुरू होईल. या ऑनलाईन उद्‍घाटनाचे प्रसारण येथील रेल्वे स्थानकावर होणार आहे. यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने यांच्यासह प्रमुख रेल्वे अधिकारी उपस्थित असतील. या गाडीचा पहिला प्रवास रेल्वेचे अधिकारी व मान्यवर करणार आहेत. तत्पूर्वी रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा शाहू महाराज टर्मिनसवरील नूतनीकरणाची पाहणी करतील. कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वेसाठी लोको पायलट एच. पी. राव आणि सहायक लोको पायलट प्रमोद खेडेकर हे सारथ्य करणार आहेत; तर सचिन सुंदी हे ट्रेन मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. वंदे भारतच्या नियमित प्रवासासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा उद्या, सोमवारपासून खुली होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com