शाहू कॉलेजच्या खेळाडूंचे जलतरण स्पर्धेत यश

शाहू कॉलेजच्या खेळाडूंचे जलतरण स्पर्धेत यश
Published on

15146
तेजस्विनी कुंभार, श्रीधर कामटे
..........
‘शाहू’च्या खेळाडूंचे
जलतरण स्पर्धेत यश

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावाच्या खेळाडूंनी दावणगिरी (कर्नाटक) येथे झालेल्या सीबीएसई साऊथ झोन टू स्वीमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत यश मिळवले. स्पर्धेत तेजस्विनी कुंभारने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक, तर शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात बाँझपदक मिळविले. श्रीधर कामटेने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात बाँझ पदक मिळवले. तेजस्विनीची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली. खेळाडूंना प्रशिक्षक मानसिंग पाटील, अंकुश पाटील, अमर पाटील, संतोष डोकरे, मोनिका कोरवी यांचे मार्गदर्शन लाभले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), प्रशांत पाटील, संगीता पाटील, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, डॉ. गणेश लवंगारे आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com