पोलिसवृत्त

पोलिसवृत्त
Published on

फोटो ः १६०६५

पाचगावमध्ये
पेंटरची आत्महत्या

कोल्हापूरः पाचगाव येथील मगदूम कॉलनीत राहणाऱ्या सागर रमेश कांबळे (वय ३५, मूळ रा. अब्दुललाट, शिरोळ) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी घरी कोणी नसताना त्याने गळफास घेतला. नातेवाइकांनी फास सोडवून बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
..................
फोटो ः १६०६४

‘ड्राय डे’ला मद्यविक्री;
एकास अटक

कोल्हापूर ः गांधी जयंतीदिवशी मद्य विक्रीला बंदी असताना गंगावेश परिसरातील हॉटेलमध्ये मद्यसाठा केल्याप्रकरणी सुहास संभाजी साळुंखे (वय ४०, रा. शुक्रवार पेठ) याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून १२ हजार ७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई केली.
..............
हालोंडीजवळ
तरुणास मारहाण
कोल्हापूर ः हालोंडीनजीक झालेल्या मारहाणीत ओमकार अरुण तडुळे (वय ३०, रा. सानेगुरुजी वसाहत) जखमी झाला. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com