विशाळगड तोडफोड पसार संशयित कणेरीमठावर

विशाळगड तोडफोड पसार संशयित कणेरीमठावर
Published on

विशाळगड तोडफोडीतील संशयित कणेरीमठावर
कोल्हापूर पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी ः अडीच महिन्यांपासून शोध सुरूच

कोल्हापूर, ता. ३ ः विशाळगड व गजापूरमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य संशयित रवींद्र पडवळ जुलै महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत आहे. मात्र, कणेरीमठावर सुरू असलेल्या हिंदू संमेलन कार्यक्रमात त्याने उपस्थिती लावली. येथे काही महाराजांचे दर्शन घेऊन चर्चा करतानाचा त्याचा व्हिडीओ त्यानेच सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या कार्यक्रमाला मोठा पोलिस फौजफाटा असताना एकाही पोलिस अधिकाऱ्याला तो दिसला नाही.
विशाळगड अतिक्रमणमुक्ती पदयात्रेच्या निमित्ताने पुण्याचा रवींद्र पडवळ व त्याचे साथीदार १३ जुलैला कोल्हापुरात दाखल झाले होते. १४ जुलैला विशाळगडाच्या पायथ्याला झालेले आंदोलन व त्यानंतर गजापूर गावात झालेली जाळपोळ, तोडफोडमध्ये त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हेही दाखल आहेत. याप्रकरणी मुख्य संशयित रवींद्र पडवळ व संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे घटनेपासून पसार आहेत. पोलिसही त्याच्या शोध घेत असल्याचे वारंवार कोल्हापूर पोलिसांकडून सांगण्यात येत होते.
गजापूर जाळपोळ प्रकरणात याआधी काही जणांना अटक करण्यात आली. प्रत्यक्षात ५०० जणांहून अधिक सहभागींवर गुन्हे दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात या तपासात कोणतीच प्रगती दिसली नाही. मुख्य संशयित दोन ते अडीच महिने पोलिसांना मिळून आलेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com