ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे सोमवारी व्याख्यान

ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे सोमवारी व्याख्यान
Published on

प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे सोमवारी व्याख्यान
डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहोत्सवी समितीतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहोत्सवी समितीतर्फे सोमवारी (ता. ७) सायंकाळी ५.३० वाजता राम गणेश गडकरी हॉल येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार (चंद्रपूर) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. माळी म्हणाले, प्रा. द्वादशीवार यांचे व्याख्यान ‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मनुघाटे उपस्थित राहणार आहेत. गडहिंग्लजच्या नेत्रालय चळवळीचे कार्यकर्ते अवधूत पाटील यांचा द्वादशीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. लवटे यांनी या संस्थेला दहा लाखांचा निधी दिला आहे.
समिती सचिव डॉ. विश्‍वास सुतार म्हणाले, ‘लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २८ डिसेंबरला शाळांमध्ये सकाळच्या सत्रात ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ. लवटे व अन्य तीन मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे.’
समितीचे खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. सी. एम. गायकवाड, भाग्यश्री कासोटे-पाटील, महेश सूर्यवंशी, संजय कळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com