

फोटो 15965
......
तर्कतीर्थांच्या साहित्यावर बहुविद्याशाखीय परिषद घेणार
डॉ. डी. टी. शिर्के; डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याकडून खंडांचा पहिला संच विद्यापीठाकडे सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे अतिव्यापक संकलन आणि संपादन करून डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सागरासारखे विशाल कार्य साकारले आहे. या साहित्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात बहुविद्याशाखीय ज्ञान परिषद घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज जाहीर केले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लवटे यांनी विक्रमी वेळेमध्ये मराठी विश्वकोशाचे पहिले अध्यक्ष तथा प्राच्यविद्यापंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे संकलन करून ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी समग्र वाङ्मया’चे १८ खंड संपादित केले आहेत. या खंडांचा पहिला संच आज डॉ. लवटे यांनी विद्यापीठास सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी तो स्वीकारला. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. रणधीर शिंदे यांनी डॉ. लवटे यांनी साकारलेल्या या महाप्रकल्पाचे महत्त्व सांगितले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी समग्र वाङ्मय खंडांचा पहिला संच कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट देऊन डॉ. लवटे यांचा विद्यापीठातर्फे सत्कार केला. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राज्यशास्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. विश्वास पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.