बसमधून दागिने चोरणारी महिलांची टोळी अटकेत

बसमधून दागिने चोरणारी महिलांची टोळी अटकेत
Published on

फोटो ः 15955

केएमटीतून उतरताना महिलेचे दागिने
चोरणारी महिलांची टोळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : केएमटी थांब्यावर गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेच्या पर्समधील सहा तोळे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. माधवी विकास लोंढे (वय ३०), अनिता सुहास लोंढे (४०, दोघी रा. कागल), रेखा विजय सकट (५५, रा. गडहिंग्लज), रूपा संतोष घोलप (४५), मंदा संतोष लोंढे (४०, दोघी रा. राजेंद्रनगर) व आरती हरी चौगले (२४, रा. निपाणी) अशी संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी सोनाली नरके (वय ५६, रा. राजेंद्रनगर) या सोमवारी दुपारी केएमटीमधून छत्रपती शिवाजी चौकात उतरल्या. याठिकाणी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, ८ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही याचा समांतर तपास सुरू होता. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही संशयित महिला त्यामध्ये दिसल्या होत्या.

सहाजणींचा सहभाग
गर्दीच्या ठिकाणी सहा संशयित महिला पोलिसांना दिसल्याने कागल, राजेंद्रनगरमधून त्यांना ताब्यात घेतले. फिर्यादी महिलेच्या सभोवती वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्यांनी ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित महिलांकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला. संशयित महिला एकमेकींच्या नातेवाईक असून, गर्दीच्या बस थांब्यांवर त्यांचा यापूर्वीही वावर मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईत उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सुरेश पाटील, विनोद कांबळे, राम कोळी, रोहित मर्दाने, अमित सर्जे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com