राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करणार ः चंद्रकांत पाटील

राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करणार ः चंद्रकांत पाटील
Published on

राहुल गांधींच्या विरोधात भाजप
निदर्शने करणार ः चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, ता. ३ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण हटवणार, असे विधान केले होते. याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष विविध ठिकाणी निदर्शने करणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याविषयी मंत्री पाटील म्हणाले, ‘संविधान बदलणार असे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पसरवले. मात्र, लोकांना त्यातील फोलपणा लक्षात आला. राहुल गांधी यांचा कार्यक्रम उधळणार नाही; मात्र जागोजागी त्यांच्या विरोधात निदर्शने करू. सतेज पाटील यांनी राहुल यांना याची कल्पना द्यावी. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जागा वाटपाची जबाबदारी आहे. ते एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी बोलत आहेत. ती चर्चा झाली की जागा वाटपाची माहिती समोर येईल.’

चौकट
संभाजीराजेंनी त्यांना घेराओ घालावा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकावरून संभाजीराजे मंत्र्यांना घेराओ घालणार आहेत. याबाबत मंत्री पाटील म्हणाले, ‘यापूर्वीच्या सरकारने काहीच केले नव्हते. आम्ही परवानग्या आणल्या, निविदा काढली, आराखडा बनवला. २५ टक्के कामही पूर्ण झाले. मात्र, न्यायालयात याचिका दाखल झाल्याने स्थगिती आली. आता ज्यांनी याचिका दाखल केली, त्यांना त्यांनी घेराओ घालावा.

महायुतीचे सरकार येऊ दे...
मंत्री पाटील म्हणाले, ‘महिला सुरक्षा, सबलीकरण करण्यासाठी देवीकडे बळ मागितले. तसेच महायुतीचे सरकार येऊ दे. शेतकरी, कामगार यांचे भले होऊ दे, अशी प्रार्थना अंबाबाईकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com