बहुजनांच्या शिक्षणाला सदैव पाठबळ द्या

बहुजनांच्या शिक्षणाला सदैव पाठबळ द्या
Published on

फोटो 16054
--
बहुजनांच्या शिक्षणाला सदैव पाठबळ द्या
खासदार शाहू छत्रपती महाराज; न्यू कॉलेजच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन आपली संस्था, महाविद्यालय कार्यरत आहे. चांगल्या विचारांनी चांगले काम करीत असून, त्याचे समाधान वाटते. भविष्याचा वेध घेऊन बहुजन, सर्वसामान्यांच्या शिक्षणाला सदैव पाठबळ द्या, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.
येथील न्यू कॉलेजच्या नव्या अकरा मजली इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती होते.
सर्वसामान्य, वंचित घटकांना बरोबर घेऊन वाटचाल करणाऱ्या या महाविद्यालयांची नवी इमारत उभारणार ही आनंददायी गोष्ट आहे. विद्यार्थी-शिक्षक प्रमाण योग्य राहील याची दक्षता संस्थेने घ्यावी. तीन वर्षांत संस्था अकरा मजली इमारत उभी करेल याची खात्री आहे. त्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी दिली.
ज्या महाविद्यालयात शिकलो त्याची अद्ययावत इमारत साकारण्याची सुरुवात करताना आनंद वाटत आहे. या इमारतीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, खजानीस वाय. एस. चव्हाण, सचिव एस. जे. मेटील, संचालक आर. डी. पाटील, सई खराडे, व्ही. एस. मोरे, पी. सी. पाटील, सविता पाटील, प्रशांत कदम, आशुतोष केसकर, उदय पाटील, सी. एम. गायकवाड, वसंत पाटील, आर. डी. ढमकले, आदी उपस्थित होते. बांधकाम समिती प्रमुख प्रा. विनय पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी न्यू कॉलेजच्या वाटचालीचा आढावा मांडला. उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.

चौकट
पहिल्या टप्प्यात सात मजल्यांचे काम होणार
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा नव्या इमारतीमध्ये दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सात मजल्यांचे बांधकाम होणार आहे. जून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रा. विनय पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com