कसबा बावडा मुख्य रस्ता वाहतूकीला बंद

कसबा बावडा मुख्य रस्ता वाहतूकीला बंद
Published on

वाहतूक मार्गात बदल
कार्यक्रमावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेने भगवा चौक ते पिंजार गल्ली हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे. तर दुचाकी व चारचाकी वाहनांना पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.
महामार्गावरून येणारी अवजड वाहने शिये फाट्यावरून राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जातील. तर चारचाकी वाहनांनी शिवराज धाबा, कदमवाडी मार्गाचा वापर करावा. दुचाकी वाहनांसाठी डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कागलवाडी, पिंजार गल्ली असा एकेरी मार्ग सुरू राहणार आहे. एसआरपीएफ कॅम्प शेजारील १०० फुटी रस्ता, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सेवा रुग्णालय आवार, दत्ताबाळ शाळा, गोळीबार मैदान, शुगर मिल परिसर, रमणमळा, लाईन बझार हॉकी मैदान येथे पार्किंगची व्यवस्था असेल
सयाजी हॉटेल येथील ५ ऑक्टोबरच्या संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमावेळी रुक्मिमीनगरकडून स्टार बझारकडे येणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात येणार आहे. पार्किंगची व्यवस्था सयाजी हॉटेलच्या पिछाडीस एलआयसी मैदानावर असेल. नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळ भेटीवेळी सोन्या मारुती चौक ते सीपीआर चौक रस्ता वाहतुकीला बंद केला जाईल. ही वाहने सीपीआर चौक, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, गंगावेश, शिवाजी पूलमार्गे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com