दसरा महोत्सव उद्घाटन बातमी

दसरा महोत्सव उद्घाटन बातमी
Published on

16093

कोल्हापूरची संस्कृती जगभर पोहचेल
पालकमंत्री हसन मुश्रीफ ः शाही दसरा महोत्सवाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ‘दसरा उत्सवाला शौर्य आणि परंपरा लाभली आहे. शेकडो वर्षांपासून राजेशाही दसरा उत्सव सुरू आहे. प्रशासनाने दसरा महोत्सवाचे आयोजन केल्यामुळे कोल्हापूरची संस्कृती जगभर पोहचणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांना हे सर्व उपक्रम पाहता येणार आहेत,’ असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाही दसरा महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आयोजन केले आहे.
भवानी मंडप या ऐतिहासिक वास्तूच्या प्रांगणात हा सोहळा झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात आठ दिवसांत होणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती सांगितली.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘अंबाबाईच्या दर्शनाला नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यामध्ये देशभरातील भाविकांचा समावेश असतो. इथला शाही दसरा महोत्सवही देशभर प्रसिद्ध आहे. शाही दसरा महोत्सामुळे इथली परंपरा, संस्कृती आणि लोकजीवनातील वैशिष्ट्ये जगभर पोहचतील. त्यामुळे जगभरातील पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होईल. पर्यटन व्यवसायाला गती मिळेल. महापालिकेनेही येणाऱ्या भाविकांची चांगली व्यवस्था केली आहे. सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.’
खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘नवरात्रोत्सवाला मोठी परंपरा आहे. याचे लोकोत्सवात रूपांतर व्हायचे असेल तर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने दसरा महोत्सवाची चांगली तयारी केली आहे. यातील विविध उपक्रमांमुळे दसरा उत्सवात नावीन्यता आली. अंबाबाई मंदिरातही सर्व व्यवस्था चांगल्या झाल्या आहेत.’
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पश्चिम देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, मधुरिमाराजे छत्रपती, उदय गायकवाड, विद्यानंद बेडेकर, प्रमोद पाटील, अमरजा निंबाळकर, अजेय दळवी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

चौकट
ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन
मेन राजाराम हायस्कूल येथे पुराभिलेखागार विभागाच्या वतीने ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन भरवले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रकाशन विभागाने पुस्तकांचे प्रदर्शन भरवले आहे. यांचे उद्‌घाटन पालकमंत्री मुश्रीफ आणि खासदार शाहू महाराज यांनी केले. या प्रदर्शननात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक कागदपत्रे पाहायला मिळतात.
-------------------------------
आज परंपरिक वेशभूषा
शुक्रवारी (ता.४) जिल्ह्यातील नागरिक, शाळा, महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून पांरपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
-----------------------
शाहू महाराजांनी आधीच सीमोल्लंघन केले
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने राजेशाहीला लोकमान्यता मिळाली. त्यामुळे शाहू छत्रपती खासदार झाले. त्यांनी दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.’
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com