

ich317.jpg (हिंदूराव शेळके)
हिंदूराव शेळके यांनी घेतली
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट
इचलकरंजी, ता. ३ ः भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी आज सांगली येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे ते निकटचे सहकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात परिचीत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधातही त्यांनी प्रदिर्घ काळ इचलकरंजीत राजकारण केले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदन कारंडे यांची उमेदवारी निश्चीत समजली जात आहे. त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच शेळके -पवार भेटीने शहरातील राजकारणाची दिशाच बदलण्याची शक्यता आहे.
कोट
मला भेट घेण्याबाबत दोनवेळा निरोप दिला होता. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज मी सांगली येथे भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही. संभाव्य उमेदवारी अथवा पक्षप्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही.
हिंदूराव शेळके, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप
--
कारंडे यांनी घेतली पवार यांची भेट
इचलकरंजी विधान सभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मदन कारंडे यांनी सांगली दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये इचलकरंजी विधान सभा मतदार संघातील राजकीय परिस्थीतीचा आढावा पवार यांनी घेतला. कारंडे यांनी त्यांना राजकीय घडामोडींसह महत्वाच्या विषयांची माहिती दिली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, माजी नगरसेवक उदयसिंह पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.