आमदार सतेज पाटील

आमदार सतेज पाटील
Published on

विधानसभा निवडणुकीत महायुतीची
एक्झिट होणारच ः सतेज पाटील

कोल्हापूर, ता. ३ : बदलापूरच्या घटनेत अजूनही काही दोषींवर कारवाई केलेली नाही. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर झाला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. महागाईचा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महायुतीकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याने महाराष्ट्रात महायुतीची एक्‍झिट ठरलेली आहे, असा दावा आमदार सतेज पाटील यांनी केला.
चुकीची वक्तव्ये करून पोलिसांचे आत्मबळ कमी करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या (ता. ४) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, ‘पोलिसांबाबत चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. सत्ताधारी पक्षातूनच पोलिसांना बोलले जात आहे. पोलिसांचे आत्मबळ कमी करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. चुकीचे बोलणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांकडून पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. पोलिसांवर इतर पक्षाच्या कोणी तरी टीका केली, तर त्यांच्यावर पोलिसांनी स्वत:हून गुन्हे दाखल केले असते. या ठिकाणी मात्र पोलिसांवरही कारवाई करू नका म्हणून दबाव टाकला जात आहे. समाजात तेढ निर्माण करून निवडणुकीसाठी काही मिळेल का, हे पाहिले जात आहे. गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत, ते कोणत्याही सूचना देत नाहीत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com