

शाहूपुरी पोलिस ठाण्याची
पोलिस अधीक्षकांकडून तपासणी
कोल्हापूर, ता. ३ : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. रात्री आठच्या सुमारास दाखल झालेल्या अधीक्षकांनी तीन तासांहून अधिक वेळ पोलिस ठाण्याची दप्तर तपासणी, तसेच प्रलंबित गुन्ह्यांची माहिती घेतली. दाखल गुन्हे, तपासातील प्रगती याची माहिती संबंधित पोलिस अंमलदारांकडून जाणून घेतली. तक्रार अर्जांचे प्रमाण न निर्गत याविषयीही माहिती घेतली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके देखील तपासणीवेळी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पोलिस ठाण्याची माहिती दिली. रात्री साडेअकराच्या सुमारास तपासणी पूर्ण झाली.
..............
अपघातानंतर तरुणास मारहाण
कोल्हापूर, ता. ३ : टाकाळा अनुकामिनी मंदिरासमोर मोटार व दुचाकी यांच्यात धडक होऊन रितेश उदय पवार (वय १९, रा. विक्रमनगर) हा दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. या अपघातानंतर मोटारचालकाला जाब विचारला असता त्याने मोटारीतील हॉकी स्टीक काढून रितेशवर हल्ला केला. यामध्ये डोक्यात हॉकी स्टीक लागल्याने जखमी झालेल्या रितेशला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.