‘शिवछत्रपती’तून फुटबॉलला पुन्हा ‘किक’

‘शिवछत्रपती’तून फुटबॉलला पुन्हा ‘किक’

Published on

फुटबॉलचा फोटो वापरणे...
..................
‘शिवछत्रपती’तून फुटबॉलला पुन्हा ‘किक’

एकोणतीस वर्षांपासून वंचित ः निकषांत बसेना, मुख्यमंत्रीच काढतील पर्याय

सचिन भोसले ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः यंदाही फुटबॉलला निकषांची नियमावली दाखवत ‘शिवछत्रपती’ पुरस्कारपासून वंचित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा विभागाने केले. निकषाचे घोडे नाचवत पुन्हा खेळाडूंच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखविली आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दरवर्षी खो-खो, कबड्डी, हँडबॉल, कराटे, कुस्ती, रग्बी, क्रिकेट, हॉकी, नेमबाजी आदी खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षक, मार्गदर्शकांनाही पुरस्कार देऊन गौरविले जाते. यात खेळाडू तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळलेला हवा. त्याच्या संघाने पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक पटकाविलेला असावा. त्याने सुवर्ण, रौप्य, कांस्य यातील एक पदक या तीन वर्षांत मिळवलेले हवे. हे निकष पार केले तरच त्याच्या प्रस्तावाचा विचार या पुरस्कारासाठी केला जातो. परंतु हे निकष गेल्या ४० वर्षांत एकाही खेळाडूला पार करता आलेले नाहीत. विशेष म्हणजे १९९५-९६ मध्ये गॉडफ्रे परेरा यांना फुटबॉल खेळातून खेळाडू म्हणून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यानंतर आजतागायत या पुरस्काराच्या शर्यतीत एकाही फुटबॉलपटूला यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे व राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी निकष बदलणे हाच एकमेव पर्याय राहिला आहे. त्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घालावे, अशी मागणी ज्येष्ठ फुटबॉलपटूंकडून व्यक्त होत आहे.
....
चौकट...
निकष असे
फुटबॉलपटूने सलग तीन वर्षे राष्ट्रीय वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊन पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक पटकाविला पाहीजे. म्हणजे संतोष ट्रॉफी, फेडरेशन कप, बी. सी. रॉय ट्रॉफी या स्पर्धांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी ९, दुसऱ्या क्रमांकासाठी ८ आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ७, सहभागासाठी ६ गुण धरले जातात. तरच त्या खेळाडूला हा पुरस्कार मिळेल. अशा निकषात गेल्या ४० वर्षांत एकही खेळाडू किंवा प्रशिक्षक बसत नाही.
...
अनिकेतही पुरस्कारापासून वंचित
सतरा वर्षांखालील फिफा युवा विश्‍वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कोल्हापूरच्या अनिकेत जाधव यानेही यंदा फुटबॉल खेळातून प्रस्ताव क्रीडा विभागाकडे दिला होता. त्याने हा विश्‍वचषक आणि आशिया स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यासाठी त्याला विशेष बाब म्हणून क्रीडा विभागाने थेट पुरस्कार देऊन गौरवायला हवे होते, पण त्याच्या प्रस्तावाला कमी गुण मिळाल्याचे व निकषात बसत नसल्याचे दाखवत त्याचा प्रस्तावच निकालात काढला.
....
कोट
अनिकेत जाधवला शिवछत्रपती पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. याबाबत मी स्वतः आणि आदित्य ठाकरे यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत बोलणे झाले होते. निकषाबाबत विफासह फुटबॉल संघटनांनी आवाज उठविणे गरजेचे आहे. तरच तो या खेळातून पुरस्कार मिळेल.
- हेन्री जोसेफ, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व सदस्य

कोट
महाराष्ट्राच्या संघाने गेल्या २९ वर्षांत एकदाही संतोष ट्रॉफी किंवा अन्य राष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन वर्षे विजेतेपद, उपविजेतेपद किंवा तिसरा क्रमांक मिळवलेला नाही. त्यामुळे या पुरस्कारापासून फिफा विश्‍वचषक खेळणाऱ्या अनिकेतसह अनेक फुटबॉलपटू यापुढेही वंचितच राहतील. त्यासाठी क्रीडा विभागाने निकषाचे धोरण बदलायला हवे. हे सर्व आता मुख्यमंत्रीच करू शकतील.
- जयदीप अंगीरवाल, आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक, पुणे
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com