संक्षिप्त
घाळी कॉलेजमध्ये छायाचित्र प्रदर्शन
गडहिंग्लज ः येथील डॉ. घाळी महाविद्यालयात धर्माचे समाजशास्त्र या शाखेला अनुसरून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचे छायाचित्र प्रदर्शन व सादरीकरण झाले. यामध्ये बी. ए. भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मंदिरांवर विद्यार्थ्यांनी छायाचित्रांसह माहितीचे सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विभागप्रमुख डॉ. सरला आरबोळे यांनी नियोजन केले. डॉ. फलराणी रजपूत यांनी स्वागत केले. प्रा. महेश पाटील यांनी आभार मानले.
---------------
गडहिंग्लजला नेहरू चौकातील खड्डे बुजविण्याची मागणी
गडहिंग्लज ः शहरातील लक्ष्मी मंदिर जवळून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीला खड्ड्यांचा अडथळा होत आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तातडीने पालिका प्रशासनाने हे खड्डे डांबरीकरणाने मुजवून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. शहरातील इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष सचिन प्रसादे यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना याबाबत निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

