मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव

Published on

फोटो 16123
16312
.........
मराठीला अभिजात दर्जा
मिळाल्याबद्दल आनंदोत्सव

कोल्हापूर, ता. ४ ः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव आज कोल्हापुरातील मराठीप्रेमींनी साजरा केला.
कला, साहित्य, लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मिरजकर तिकटी येथे आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना साखर वाटप केले. प्राचार्य डॉ. जे. के. पवार, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, निवेदक पंडित कंदले, गझलकार नरहर कुलकर्णी, हेमंत डांगे, प्रदीप पाटील, अनिता नलगे, गीता हसुरकर, प्रा. शशिकला सरगर, स्नेहा वाबळे, मावळा फाउंडेशनचे उमेश पोवार, वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम, आर्किटेक्ट जीवन बोडके उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेने साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, राधिका पारखी, प्रसाद चव्हाण, अर्जुन आंबी, प्रभू गायकवाड, सचिन पाटील, कपिल सरनाईक, बबन गवळी, श्रीकांत मंडलिक, सूरज धनवडे, विकास शिरगावे, रियाज बागवान, सुभाष भोसले उपस्थित होते.
...........
कोट
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा मायमराठीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. याचा सर्वस्वी आनंद आणि अभिमान आहे.
- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com