रोटरी क्लब ऑफ सनसाईजतर्फे झांजरिया

रोटरी क्लब ऑफ सनसाईजतर्फे झांजरिया
Published on

‘रोटरी-सनसाईज’तर्फे
आज रंगणार `झांजरिया‘

कोल्हापूर, ता. ४ : ‘मारो घागरो जो घ्युमो..’ अशा संमोहित माहोलात उद्या (शनिवारी) ‘झांजरिया’ रास-दांडिया उत्सव रंगणार आहे. येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, सनराईजच्या वतीने होणाऱ्या या उत्सवात तब्बल दीड लाखाची बक्षिसे जिंकता येणार आहेत. मार्केट यार्डातील रामकृष्ण लॉनवर शहरातील सर्वांत मोठा पंधरा हजार चौरस फुटांचा भव्य डान्स फ्लोअरवर सायंकाळी सहापासून या आनंदोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
वर्षभरात क्लबच्या माध्यमातून कार्डियाक ॲम्ब्युलन्ससाठी ७२ लाख, कणेरी मठावरील डॉग शेल्टर हाऊससाठी ५२ लाख, मॅमोग्राफी मशीनसाठी ६३ लाख, विशेष मुलांसाठी ई-लर्निंग सुविधा, नवजात अर्भकासाठी एनआयसीयू, विविध शाळांसाठी बेंचेस, आदी उपक्रम होणार आहेत. गेली २७ वर्षे क्लबतर्फे दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या उत्सवात अहमदाबादचे प्रसिद्ध डीजे पार्थ यांच्या संगीताच्या तालावर दांडियाचे फेर रंगणार आहेत. झांजरिया बेस्ट ग्रुप, झांजरिया किंग, झांजरिया क्वीन, झांजरिया बेस्ट दांडिया (पुरुष, महिला), झांजरिया बेस्ट गरबा (पुरुष, महिला), बेस्ट कपल, बेस्ट सीनियर कपल, बेस्ट ड्रेस (पुरुष, महिला), बेस्ट रोटरी कपल, आदी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याशिवाय विविध वयोगटनिहाय वैयक्तिक बक्षिसांचीही पर्वणी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com