कलाउत्सव स्पर्धेमध्ये लोहिया हायस्कूलचे यश

कलाउत्सव स्पर्धेमध्ये लोहिया हायस्कूलचे यश

Published on

15373
कोल्हापूर : माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे गुणवंताचा सत्कार करताना डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रसाद पाटील, एस. के. यादव, सुनंदा चव्हाण, धनश्री पाटील, विश्‍वास सुतार, तुषार पाटील, अमृता मोरे, सुनीता पाटील आदी.

समाजाला दिशा देणारे
रक्तदाते व्हा : डॉ. हिर्डेकर
कोल्हापूर : ‘‘विज्ञान युगात अजून तरी मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही, म्हणून गरजू रुग्णाला तत्काळ रक्त उपलब्ध व्हावे, याकरिता प्रत्येक तरुणांनी किमान वर्षातून एक ते दोनवेळा ऐश्‍चिक रक्तदान करावे,’’ असे प्रतिपादन डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले. वसंतराव चौगुले पतसंस्थेचे व्यवस्थापक वसंतराव चव्हाण यांचा राज्यस्तरीय शतकवीर रक्तदाता म्हणून माणिकराव पाटील फाउंडेशनतर्फे सत्कार केला. पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील अध्यक्षस्थानी होते. फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. अजित सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. राज्यातील शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, संगीत, कला, आध्यात्मिक क्षेत्रातील ४० गुणवंतांचा सत्कार शाहू स्मारक येथे झाला. शाहूवाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्‍वास सुतार, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे उपनिरीक्षक आर. जे. चौगले, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, रवी पाटील, सुनीता पाटील, तुषार पाटील, धनश्री पाटील, अमृता चव्हाण, बबनराव मोरे, पी. आर. पाटील, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, श्री. वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, उपसरव्यवस्थापक तुकाराम पाटील, शशिकांत मोरे, राजू कोळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com