गड- दहा लाखाची फसवणूक

गड- दहा लाखाची फसवणूक

Published on

गडहिंग्लजच्या महिलेची
दहा लाखांची फसवणूक
धमकी देत ऑनलाईन पैसे लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः मी नार्कोटिक्स अधिकारी असून, तुम्ही पाठविलेले पार्सल बेकायदेशीर कृत्याशी संबंधित असल्याची बतावणी करत कारवाईची धमकी देऊन अनोळखी व्यक्तीने येथील एका महिलेची ऑनलाईन पद्धतीने १० लाख ६८ हजारांची फसवणूक केली. पूजा शिवाजी चव्हाण असे त्यांचे नाव असून, त्यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, ३० सप्टेंबर रोजी पूजा घरी होत्या. त्यांना सकाळी साडेनऊला एका समाज माध्यमाच्या अॅपच्या माध्यमातून एका मोबाईलवरून फोन आला. संबंधित व्यक्तीने मी नार्कोटिक्स अधिकारी असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्याने तुम्ही इराणला पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असून ते बेकायदेशीर कृत्याशी संबंधित असल्याची बतावणी केली. त्यानंतर कारवाईची धमकी दिली; परंतु, मी कोणतेच पार्सल पाठविले नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले. मात्र, तो कायदेशीर कारवाईची धमकी देत राहिला. त्यामुळे चव्हाण घाबरल्या.
त्यातच त्या व्यक्तीने त्यांच्याकडून ऑनलाईनद्वारेच पैशांची मागणी केली. त्यात चव्हाण यांनी त्यांच्या खात्यावर १० लाख ६८ हजार रुपये वर्ग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक गजानन सरगर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com