सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो
लोगो- आजच्या ए सेक्शन २०२ ॲंकर बातमीतून
‘सकाळ’तर्फे आजपासून ‘प्रॉपर्टी एक्स्पो’
चला, महासैनिक दरबार हॉलला, सलग तीन दिवस वास्तू प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘सकाळ’च्या ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ प्रदर्शनाला शनिवारी (ता. ५) प्रारंभ होणार आहे. मेट्रो लाईफ सिटी प्रस्तुत या प्रदर्शनात जिल्ह्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला आहे. सर्किट हाउस रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये सोमवारपर्यंत (ता. ७) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहील.
दरम्यान, या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शहरातील गृह प्रकल्पांची माहिती येथे एकाच छताखाली मिळणार आहे. प्रवेश व पार्किंग मोफत असून, आविष्कार इन्फ्रा हे सहप्रायोजक आहेत.
मला घर घ्यायचे आहे; पण कोठे, किती दर असतील, सुविधा कोणकोणत्या मिळतील, बजेटमध्ये फ्लॅट मिळेल काय, अशा शंकांचे निरसन आता या तीन दिवसांतच होणार आहे. यासाठी ‘सकाळ’च्या ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ला नक्की भेट द्यावी. कारण, तुमच्या सर्व शंकांचे निरसन प्रदर्शनात होणार आहे. शहरातील विविध भागांतील वेगवेगळ्या गृहप्रकल्पांच्या माहितीसह अनेक सवलतींचा वर्षावही येथे होईल. प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सकडून सूटही मिळणार आहे. प्रदर्शनात सुमारे १७ लाखांपासून ते चार कोटींपर्यंतची घरे पाहायला मिळतील. त्यांच्यातील सुविधांसह अत्याधुनिक बांधकामाचा दर्जाही येथे प्रत्यक्षात बिल्डर्सकडून जाणून घेता येणार आहे. प्रदर्शनात वन, टू, थ्री व फोर बीएचके फ्लॅटसह ड्युप्लेक्स फ्लॅट, पेंट हाउसेस, रो बंगलो, प्लॉटस्, कमर्शियल गाळे यांची भव्य रेंज असेल. शहरासह उपनगरांतील आणि गावठाणातील गृह प्रकल्पांचीही माहिती प्रदर्शनात मिळणार आहे.
चौकट
अधिक माहितीसाठी संपर्क
लक्ष्मीकांत औंधकर : ९५२७९७२५००
सूरज जमादार : ९५५२५८१९१८
-----
चौकट
सहभागी संस्था
मेट्रो लाईफ सिटी, आविष्कार इन्फ्रा, रेसन्स कन्स्ट्रक्शन, श्री श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, साई डेव्हलपर्स अँड बिल्डर, देशपांडे इन्फ्रा, रिषभ बिल्डर्स, गुरुप्रसाद डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, दत्त साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, महाभारत कन्स्ट्रक्शन, बेडेकर लाईफ्सस्पेसेस एलएलपी, लोखंडे बिल्डर्स, सिद्धिविनायक रिअलटर्स, श्री सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स १, सूर्यवंशी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बटू बिल्डर्स, रामसिन्हा ग्रुप, सूरज इस्टेट डेव्हलपर्स, श्री मधुपुरी कन्स्ट्रक्शन्स, पद्मप्रिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विश्वकर्मा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड, गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चर, साळोखे बिल्डर्स, आयडियल कन्स्ट्रक्शन्स.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

