‘सारथी’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी  दिनांकपासून संपूर्ण अधिछात्रवृत्ती

‘सारथी’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकपासून संपूर्ण अधिछात्रवृत्ती

Published on

‘सारथी’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी
दिनांकापासून संपूर्ण अधिछात्रवृत्ती

कोल्हापूर, ता. ४ : सारथी आणि महाज्योतीच्या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश आले आहे. राज्य शासनाने बार्टी संस्थेतील नियमांप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या ९६९ पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून देण्याचा आदेश आज काढला.
राज्यातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी दिनांकापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी, यासाठी कोल्हापूर, पुणे, आझाद मैदान, नागपूर, पुण्यातील फुलेवाडा ते विधानभवन पायी लाँगमार्च, साखळी उपोषण, अशी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन शासनाने २५ जुलैला सर्व संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बार्टी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यामुळे २५ ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळाच्‍या‍ बैठकीत बार्टीला शंभर टक्के फेलोशिप देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पुणे येथे ‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांनी, तर नागपूर येथे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी उपोषण केले. त्यावर सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांना समान धोरणानुसार शंभर टक्के फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्यास २३ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्याबाबतचा शासन आदेश आज काढला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

कोट
गेले दीड वर्षे २०२३ च्या बॅचच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी. यासाठी विविध माध्यमांतून लढा सुरू होता. आज १०० टक्के फेलोशिपच्या निर्णयाने आमच्या लढ्याला यश आले. संशोधनाचे काम, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून, आघाडीवर राहून आंदोलनात उतरणाऱ्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे हे यश आहे. लढ्यास सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी आणि पत्रकार, विविध संघटनांचे मनःपूर्वक आभार.
- प्रियांका पाटील, सारथी संशोधक विद्यार्थी.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com