16119
मारुती पोवार यांची निवड
कोल्हापूर : शाहूनगर, जवाहरनगर येथील राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मारुती पोवार यांची शिवसेना (शिंदे गट) शहर ‘दक्षिण’च्या उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष शरद सोनुले यांनी नियुक्तीपत्र दिले.
...
16128
अय्याज बागवान यांची निवड
कोल्हापूर : जिल्हा ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अय्याज बागवान यांची फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या खजिनदार पदावर निवड झाली. कोलकाता येथे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनची सर्वसाधारण सभा झाली. सभेला संपूर्ण देशभरातून ऑटोमोबाईल स्पेअर पार्टस् विक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनवणे, कार्यकारणी सदस्यांनी श्री. बागवान यांची एकमताने निवड केली.
वह्यांचे वाटप
इचलकरंजी : श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने जवाहरनगर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले होते. शंभर विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. एस. जी. गाडेकर यांनी स्वागत केले. पी. बी. पताडे यांनी प्रास्ताविक केले. सागर कुंभार, संदीप मुळीक, सुमित खंदारे, पर्यवेक्षक एम. ए. करव उपस्थित होते. बी. टी. ऐनापुरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

