निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या

Published on

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...

16451
16450

राष्ट्रीय स्पर्धेत टक्का वाढेल
आमच्या काळात केवळ पायात स्टडचे बुट आणि किट मिळाले की, आम्ही सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात सराव करीत असे. आमच्या तालमीचे किट म्हणजे शान असे. ते घातल्यानंतर अंगात हुरूप येत असत. सराव आणि प्रत्येक सामन्याच्या मध्यंतरात लिंबूची फोड आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉल पावडर आणि पाणी मिळत होते. केवळ तालमीच्या विजयासाठी चांगला खेळ करायचा, इतकेच आमच्या मनात असायचे. त्यामुळे जीव तोडून आम्ही सराव आणि प्रतिस्पर्धी संघासोबत खेळायचो. आजच्या इतक्या प्रशिक्षणाच्या सुविधाही मिळत नव्हत्या. नोकरीतही रात्रंदिवस काम करून सकाळी सराव करायचा आणि सामनेही खेळायचे. आज खेळाडूंना खेळातून नोकरी लागल्यानंतर कार्यालयीन काम कमी आणि सरावाकरिता कामकाजातून सुट दिली जाते. फुटबॉल खेळाचे तंत्र बदलत आहे. नवे नियम, शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण, निवासी व्यवस्था, आहार आणि शिस्त आदींकरिता क्रीडा विभागाची निवासी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. यापूर्वी असलेले केंद्र विभागाने कोणतेही कारण न देता बंद केले आहे. हे केंद्र पुन्हा सुरू केले तर निश्‍चितच कोल्हापूरचे नवोदित खेळाडू भविष्यात राष्ट्रीय स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करतील. इतके टॅलेंट कोल्हापूरसह परिसरात आहे. याचा विचार क्रीडा विभागाने जरूर करावा.
- संपत मंडलिक, ज्येष्ठ फुटबॉलपटू
------------------------------
नवोदितांना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल
कोल्हापुरात कुस्ती, फुटबॉल, मल्लखांब, हॉकी, नेमबाजी, रग्बी, जलतरण आदी खेळांना पोषक वातावरण आहे. विशेषतः फुटबॉल खेळ शहरातील प्रत्येक घराघरांत पोहचला आहे. अनेक घरांमध्ये मुलगा असो वा मुलगी असो तो फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतो. घरातूनच खेळाचे बाळकडू मिळते, इतका फुटबॉल रुजला आहे. पण या खेळाला शिस्तीची चौकट नाही. खेळाडू आणि पालकांची बाहेरच्या जिल्ह्यात, राज्यात जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळे दर्जेदार खेळाडू असूनही भविष्यासाठी घर सोडत नाहीत. त्यामुळे संधी असूनही जाता येत नाही. त्याला आर्थिक बाब हे मोठे कारण आहे. शहरातील दोनशेहून अधिक शाळांमध्ये फुटबॉल खेळासाठी संस्थाचालक आग्रही आहेत. त्यामुळे खेळाचा टक्का वाढत आहे. इतर खेळासोबत फुटबॉल खेळाला प्राधान्य देत आहेत. शाळेतील प्रशिक्षकांनी दिलेल्या शिदोरीवरच अनेक खेळाडू घडत आहेत. पण ॲडव्हान्स ट्रेनिंग, आहार, खेळातील तंत्रे शिकायला मिळत नाहीत. त्यामुळे आता कोल्हापुरात शासनाने फुटबॉल अकादमी सुरू होणे गरजेचे आहे. किंबहुना यापूर्वी १९९६ मध्ये सुरू झालेली क्रीडा प्रबोधिनीचे फुटबॉल निवासी केंद्र बंद का केले; हे विचारणा करण्यापेक्षा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता हे केंद्र त्वरित सुरू करावे.
- जितेंद्र लाड, ज्येष्ठ फुटबॉलपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com