राहुल गांधी भाषण बातमी

राहुल गांधी भाषण बातमी

Published on

Ø16487
कोल्हापूर ः येथे शनिवारी झालेल्या संविधान सन्मान संमेलनात बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी. व्यासपीठावर (डावीकडून) प्रतिमा शिंदे, अशोक भारती, सुभाषिनी यादव, गुणिदास महाराज, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, अशोक जयहिंद, प्राचार्य टी. एस. पाटील आदी. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

6482
कोल्हापूर ः येथे शनिवारी झालेल्या संविधान सन्मान संमेलनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आवाहनाला संविधानावरील पुस्तिका उंचावून उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
16485
कोल्हापूर ः येथे शनिवारी झालेल्या संविधान सन्मान संमेलनात सहभागी नागरिक.


आरक्षणाची मर्यादा वाढविणार
राहुल गांधी ः संघ, भाजपचा संविधान बदलण्याचा डाव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला संविधान बदलायचे आहे. कारण, त्यांना देशातील ९० टक्के लोकांना मागेच ठेवायचे आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर पहिल्यांदा आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त करणार आहोत, अशी ग्वाही लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज येथे केले. येथील सयाजी हॉटेलमध्ये झालेल्या संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते.

यावेळी विठ्ठल-रुक्मिणीची श्री. गांधी यांचा सत्कार मूर्ती देऊन करण्यात आला. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला. यातील शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिक्षणाचा अर्थ केवळ शालेय नव्हे तर आपल्या अवती भवती जे चालू आहे त्याचे निरीक्षण केले पाहिजे. त्यानंतर आपल्याला संघटीत होण्याची आणि संघर्ष करण्याची आवश्यकता वाटेल. शिक्षण व्यवस्था विशिष्ठ शक्तींच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात दलित, आदिवासी यांचा उल्लेख नाही. संघ आणि भाजपला हेच करायचे आहे.’’
श्री. गांधी म्हणाले, ‘‘संविधानाचे रक्षण करायचे असल्यास आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक केली पाहिजे. प्रत्येकाला प्रगतीची समान संधी दिली पाहिजे. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यातून कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे, हे समोर येईल. देशातील एकूण संपत्तीपैकी त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, हे स्पष्ट होईल.’’
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘देशाला गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. मात्र, नंतरच्या काळात समाज वेगळ्या दिशेला गेला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये आरक्षण दिले. त्यापूर्वी संस्थानामध्ये ९० टक्के लोक विशिष्ठ समाजाचे होते. आता संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने आता ते संविधानाच्या मूलभूत तत्त्वाला हात लावू शकत नाहीत. आपण संविधानाच्या रक्षणासाठी सिद्ध असले पाहिजे.’’
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सतेज पाटील, भाई जगताप, उल्हास पवार, खासदार प्रणिती शिंदे, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पाटील, मालोजाराजे छत्रपती, राहुल पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.

जातीनिहाय जनगणनेसाठी कायदाच करू!
राहुल गांधी म्हणाले, ‘‘सत्य समोर येऊ नये म्हणून भाजप आणि संघाला जातीनिहाय जनगणना करायची नाही. कारण, ते सत्याला घाबरतात. आम्ही सत्तेवर येताच जातीनिहाय जनगणनेसाठी कायदाच करू. सध्या केवळ पाच टक्के लोक देश चालवतात. न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे यामध्ये दलित, आदिवासी यांचा टक्का सर्वात कमी आहे. संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करावा लागेल.’’


स्वप्नील कुंभार यांचे कौतुक
राहुल गांधी यांना देण्यात आलेली विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती कदमवाडी येथील मूर्तिकार स्वप्नील कुंभार यांनी घडविलेली आहे. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान कुंभार यांना बोलावून घेतले आणि त्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com