भाजप निदर्शने बातमी

भाजप निदर्शने बातमी

Published on

(फोटो - १६६३६)
...
भाजपची राहुल गांधींविरोधात निदर्शने

कोल्हापूर, ता. ५ ः `अमेरिकेत जाऊन आमची सत्ता आली, तर आरक्षण रद्द करणार, असे म्हणणारे राहुल गांधी संविधानाचा सन्मान काय करणार?’ असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. आज त्यांनी भाजप कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापटही झाली.
राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयात सकाळी एकत्र आले. त्यानंतर ते कावळा नाका येथे निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडवले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, ‘भारतातून परदेशात जायचे आणि त्याठिकाणी वारंवार देशाचा अपमान करायचा. खऱ्या अर्थाने बघितले तर आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते काँग्रेसचे नेतेच आहेत. आरक्षण कोणीही हटवू शकत नाही. राहुल गांधी यांना संविधान सन्मान करण्याचा नैतिक अधिकार नाही.’ ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, ‘ज्यांच्या घराण्याने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, तेच राहुल गांधी आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला येत आहेत, याच्यासारखी शरमेची गोष्ट नाही.’ प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान जनता विसरणार नाही. ’
यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित कदम, सरचिटणीस संजय सावंत, गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन, राजू जाधव, शिवाजी बुवा, विठ्ठल पाटील, शहाजी भोसले, हंबीरराव पाटील, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, राजू मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com