टेनिक्वाईट स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचे यश

टेनिक्वाईट स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचे यश

Published on

17729
कोल्हापूर ः मनपास्तर टेनिक्वाईट स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या गर्ल्स हायस्कूलच्या चौदा व सतरा वर्षांखालील संघासोबत मान्यवर उपस्थित होते.
....
टेनिक्वाईट स्पर्धेत
गर्ल्स हायस्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः मनपास्तर शालेय टेनिक्वाईट स्पर्धेत चौदा व सतरा वर्षांखालील स्पर्धेत गर्ल्स हायस्कूल संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविले.
राजोपाध्येनगरातील गोविंदराव पानसरे विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. चौदा वर्षाखालील मुलींमध्ये गर्ल्स हायस्कूल संघाने अंतिम सामन्यात राजर्षी शाहू हायस्कूल संघावर दोन विरुद्ध एक गुणांनी मात करीत विजेतेपद मिळवले. विजयी संघात प्रिया मगदूम, अनुष्का गावडे, देवश्री पाटील यांचा समावेश होता, तर सतरा वर्षांखालील गटात या संघाने इंदिरा गांधी विद्यालयाचा दोन विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करीत विजेतेपद मिळवले. संघात तेजस्विनी चव्हाण, सिद्धी माने, इशा सूर्यवंशी, श्रद्धा घाडी, अनुष्का पाटील यांचा समावेश होता. या दोन्ही संघाला मुख्याध्यापिका एच.एच.गोसावी यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा शिक्षिका उज्वला देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com