ती ऊर्जाशक्ती
लोगो ती ऊर्जाशक्ती
-
फोटो - 17831
समुपदेशनातून जागविली
मुलांची बौद्धिक ‘अस्मिता’
- नंदिनी नरेवाडी
बारावीला अवघे पस्तीस टक्के मार्क त्या विद्यार्थिनीला पडले. त्या विद्यार्थिनीपेक्षा पालक जास्त हवालदिल झाले. मुलगी हुशार नाही ‘ढ’च आहे, असा जणू त्यांनी शिक्काच मारला. पण, त्याच पालकांनी तिला मानसोपचार समुपदेशक असलेल्या अस्मिता पाटील यांच्याकडे आणले. आणि त्यांनी त्या मुलीची बौद्धिक चाचणी घेतली. तिला काही ‘टिप्स’ दिल्या. त्या इतक्या ओघवत्या भाषेत आपुलकी आणि मायेने समजावून सांगितल्या की त्याच विद्यार्थिनीने पदवीला ८५ टक्के गुण मिळवले. एकेकाळी मठ्ठ असलेली मुलगी हुशार, चुणचुणीत, ध्येय साध्य करणारी बनली. पालकांनाही तिचा हेवा वाटला.
शाळा, महाविद्यालयांत अनेक मुलांची प्रगती कमकुवत असते. पालक, शिक्षक सगळेजण प्रयत्न करतात. पण मुलांच्या प्रगतीत फारसा फरक पडत नाही. तेव्हा त्या मुलाच्या अनेक चुकांवर बोट ठेवणे, मुलांचे खच्चीकरण करणे, हा मोबाईलच जास्त पाहतो, याला झोपायलाच आवडते, तो अभ्यासच करत नाही, अशा सूचनांनी त्या मुलांना मागे ठेवले जाते. मात्र, काही पालक समजूतदार असतात. ते ‘अस्मिता’ यांच्याकडे येतात. अशा असंख्य मुलांचे समुपदेशन करतात. यासाठी अनेक पालकांना काही रक्कम खर्च करावी लागते. उच्च वर्गातील कोणताही पालक आपल्या मुलांच्या हितासाठी रक्कम खर्च करेल, समुपदेशन घेईल. मात्र, समाजातील दुर्बल, गरजू घटकांतील मुलांचे काय, त्यांना हा खर्च करता येणे शक्य नाही. ही अडचण जाणून त्यांनी मोफत समुपदेशन केले आहे. तेही एक दोन मुलांना नव्हे तर दोनशेहून अधिक मुलांना. त्या शाळा महाविद्यालयात स्वतः जातात. मुख्याध्यापक, प्राचार्यांना समजावून सांगतात. त्यांच्या परवानगीने त्या शाळा, महाविद्यालयांत मुलांचे समुपदेशन सुरू होते.
अस्मिता पाटील या कोविडपूर्वी शाळा चालवत होत्या. जेथे मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारी शिक्षण दिले जात होते. सुतार, गवंडी, माळी, गवळी अशी कौशल्याची कामे करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांचे काम कसे चालते, याचे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती विद्यार्थ्यांना दिली जात होती. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी विविध प्रयोग केले जात होते. मात्र, कोविडमध्ये शाळा बंद होऊन सर्व शिक्षण मोबाईलवर दिले जाऊ लागले. हे अस्मिता यांना मान्य नव्हते. परिणामी, त्यांनी शाळा बंद केली असली तरी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलांच्या गुणवत्तेला त्या पैलू पाडू लागल्या आहेत.
अस्मिता यांचे पती प्रा. दिनेश पाटील हे वारणा महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना मोफत मार्गदर्शन करतात. सातत्याने अभ्यास करताना मुले नैराश्यात जातात. यश नाही मिळाले तर दु:खी होतात. पुन्हा जिद्दीने उभी राहत नाहीत, अशा वीस ते बावीस मुलांना त्यांनी मानसिकदृष्ट्या कसे सक्षम व्हायचे, याचे धडे दिले. या सर्वाचा परिपाक म्हणून आज या विद्यार्थ्यांतून तलाठी, प्राध्यापक, शासनाचे विविध रिसर्च प्रोजेक्ट मिळवणारे विद्यार्थी घडले आहेत.
-----
कोट
मी मुलांना मेमरी टेक्निक्स शिकवते. पूर्वी याबाबत जागरुकता नव्हती. मात्र, सध्या पालकांमध्ये ती दिसते. ही टेक्निक्स मी मोफत शिकवते. मी प्रोफेशनल फोटोग्राफरसोबत कौन्सिलिंग सायकॉलिस्ट आहे. याचा मला बराच फायदा झाला. ज्यामुळे मुलांच्या मनात मी आत्मविश्वास पेरू शकले.
- अस्मिता पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

