राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत स्वाती, अमृता आदींचे यश

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत स्वाती, अमृता आदींचे यश

Published on

17939
कोल्हापूर ः सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथे झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या संघासोबत मान्यवर उपस्थित होते.
.....
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत
स्वाती, अमृता यांचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथे झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत स्वाती शिंदे, तन्वी मगदूम, शिवानी मेटकर, अमृता पुजारी, स्नेहल पालवे, नेहा चौगले, संज्योती पाटील यांनी ग्रीको रोमन प्रकारात यश मिळवले.
स्पर्धेत स्वाती शिंदेने ५३ किलो, तर गौरी पाटीलने ५० आणि तन्वी मगदूमने ५९ किलो गटात, शिवानी मेटकरने ६८ किलो गटात आणि अमृता पुजारीने ७६ किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. स्नेहल पालवेने ५५ किलो गटात रौप्य, तर नेहा चौगलेने ब्राँझ पदक आणि संज्योती पाटीलने ५८ किलो गटात ब्राँझ पदक मिळवले. तर मुलांमध्ये सुशांत पालवेने ७२ किलेगटात, तर रोहन रंडेने ९७ किलो गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. हे सर्व मुरगूडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुलाचे मल्ल आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com